(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 16 Winner MC Stan : "चाहत्यांच्या प्रेमामुळे मी जिंकलोय"; 'बिग बॉस 16'च्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅनची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया
MC Stan : 'बिग बॉस 16'च्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅन एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला,"चाहत्यांच्या प्रेमामुळे मी जिंकलो आहे".
Bigg Boss 16 Winner MC Stan First Reaction : पुणेकर एमसी स्टॅन (MC Stan) 'बिग बॉस'च्या 16 व्या पर्वाचा (Bigg Boss 16) विजेता ठरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एमसी स्टॅनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'बस्ती का हस्ती' अर्थात एमसी स्टॅनने बिग बॉसच्या विजेतेपदावर (Bigg Boss Winner MC Stan) नाव कोरल्यानंतर एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रॅपर म्हणाला,"चाहत्यांच्या प्रेमामुळे मी जिंकलो आहे".
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत एमसी स्टॅन म्हणाला,"बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकल्याचा खूप आनंद आहे. 'बिग बॉस 16' जिंकावं अशी खरतरं माझ्या भावाची म्हणजेच शिवची इच्छा होती. पण आता तो मला समजून घेईल अशी आशा आहे. चाहत्यांच्या प्रेमामुळे मी जिंकलो आहे. पुण्यात मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे पुणेकरांसह माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. खूप खूप प्रेम".
23 व्या वर्षी एमसी स्टॅनचं सर्वत्र कौतुक
एमसी स्टॅनवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'बिग बॉस 16'चा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) किंवा प्रियंका चौधरी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एमसी स्टॅनला सर्वाधिक वोट्स मिळाल्याने तो या पर्वाचा विजेता ठरला आहे. सध्या एमसी स्टॅन ट्रेडिंगमध्ये आहे. वयाच्या 23 व्या वर्षी एमसी स्टॅनला मिळालेल्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
एमसी स्टॅनने 'बिग बॉस'चा दमदार खेळ खेळला आहे. त्याचा प्लॅन आणि स्ट्रॅटेजीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तो त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे कायम चर्चेत असतो. त्याचा '80 हजार के जूते' हा डायलॉग गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
एमसी स्टॅन अतिशय शांतपणे बिग बॉसचा खेळ खेळत होता. पहिल्या आठवड्यात त्याने कोणाशीही मैत्री केली नाही. तो एकटा राहत असे. पण नंतर एमसी स्टॅन, शिव, अब्दू, साजीद खान, गोरी नागोरी यांच्यात चांगली मैत्री झाली. हळहळू त्याने आपल्या हटके खेळीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आज एमसी स्टॅनचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याची गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. एमसी स्टॅनने 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकावी असं त्याच्या आईचं स्वप्न होतं.
संबंधित बातम्या