(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala : 'जिलबी' चित्रपटात प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी साकारणार भूमिका ते सुबोध भावेनं केली नव्या चित्रपटाची घोषणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Prithvik Pratap: पृथ्वीक आणि प्रियदर्शनीनं ‘चलेया’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, समीर चौघुले कमेंट करत म्हणाला, "मी आधीच म्हणत होतो..."
Prithvik Pratap: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या चित्रपटामधील चलेया या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ अनेकांनी शेअर केले. या गाण्यामधील नयनतारा आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता चलेया या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) आणि पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला समीर चौघुलेनं (Samir Choughule) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Subodh Bhave: सुबोध भावेचा संगीतमय चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पोस्ट शेअर करत म्हणाला, "पुण्यातील FTII च्या पवित्र जागेत..."
Subodh Bhave: अभिनेता सुबोध भावेच्या (Subodh Bhave) कट्यार काळजात घुसली या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा संगीतमय चित्रपट 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडीनं बघतात. आता कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर आणखी एका संगीतमय कलाकृतीमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुबोधनं त्याच्या "मानापमान" या आगामी संगीतमय चित्रपटाची घोषणा केली आहे. सुबोधनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या आगामी चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Adinath Kothare: "किती वेळा सांगितलं ओ बाप्पा तुम्हाला..."; आदिनाथ कोठारेच्या लेकीचा क्युट अंदाज
Adinath Kothare: अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आदिनाथ हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. नुकताच आदिनाथनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदिनाथची मुलगी जीजाचा (Jija Kothare) क्युट अंदाज दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane: "ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. नुकतीच एक खास पोस्ट किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Prasad Oak: प्रसाद ओकचा 'जिलबी' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका
Prasad Oak: अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. प्रसादच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच प्रसादचा जिलबी (Jilbi) हा चित्रपट प्रेक्षकांच्य भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटामध्ये काही प्रसिद्ध कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत.