Prithvik Pratap: पृथ्वीक आणि प्रियदर्शनीनं ‘चलेया’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, समीर चौघुले कमेंट करत म्हणाला, "मी आधीच म्हणत होतो..."
चलेया या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) आणि पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) यांनी शेअर केला आहे.
Prithvik Pratap: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या चित्रपटामधील चलेया या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ अनेकांनी शेअर केले. या गाण्यामधील नयनतारा आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता चलेया या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) आणि पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला समीर चौघुलेनं (Samir Choughule) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील कलाकार पृथ्वीक प्रताप आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी चलेया या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला पृथ्वीकनं कॅप्शन दिलं, 'कात्रजच्या नयनतारासह "चलेया" या व्हिडीओवर प्रियदर्शनीनं कमेंट केली,'है मेरा विक्रोळी का शाहरुख!' व्हिडीओ शेअर करताना दोघांनी एकमेकांच्या नावाचा केलेला हा भन्नाट उल्लेख नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.
समीर चौघुलेची भन्नाट कमेंट
पृथ्वीक प्रताप आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्या या डान्सच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. समीर चौघुलेनं या दोघांच्या व्हिडीओला कमेंट केली, "मी आधीच म्हणत होतो माझ्या शिवाय करा हे रील..पण नाही"समीर चौघुलेनं केल्या या भन्नाट कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
पृथ्वीक प्रतापनं काही दिवसांपूर्वी एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर डान्स करताना दिसत होता. या व्हिडीओमध्ये तो शाहरुखच्या जवान या चित्रपटामधील लूकसारख्या हुबेहूब लूकमध्ये दिसला.
View this post on Instagram
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधील पृथ्वीक प्रतापसोबतच समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळते. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही (Prajakta Mali)'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते.
इतर महत्वाच्या बातम्या: