Kiran Mane: "ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. नुकतीच एक खास पोस्ट किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
किरण माने यांनी त्यांच्या एका मित्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "जयभीम कसं थाटात आन् टेचात लिहिलंय नंबर प्लेटवर. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू हाय ही भावांनो ! मला आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट मी शक्यतो तपासून ॲक्सेप्ट करतो. अशीच एक रिक्वेस्ट आली. त्यावर हा नादखुळा फोटो दिसला. नवल वाटलं. पोस्ट पाहिली, तर आंबेडकर जयंतीची ही पोस्ट होती. त्यावर कॅप्शन लिहिलं होतं, 'बापाचा दिवस नसतो. आपला प्रत्येक दिवस त्या बापामुळेच असतो. क्युरीऑसिटी वाढली. या भन्नाट मानसाशी संपर्क साधला. दूर असला तरी हा आपला हमदम, हम-नफ़स निघणार याची खात्री होतीच, ती पक्की झाली. म्हन्ला, 'तुम्ही समविचारी आहात, म्हणून मैत्रीचा हात पुढं केला."
"अमित भुतांगे ! नागपूरचा. सध्या ॲडलेड इथं फिजीओथेरपीस्ट म्हणून नाव कमावतोय. तिथंच स्थायिक झालाय. निव्वळ टॅलेंटच्या बळावर मोठा झालाय.ऐश्वर्यसंपन्न झालाय. पण तरी पण आपली पाळंमुळं इसरलेला नाय. आपल्या शिक्षनाचा पाया ज्याच्यामुळं घातला गेला, त्या बापाला काळजात जपून ठेवलंय. 'आपण खातो त्या भाकरीवरच नाय, तर ब्रेड-बटर, पिझ्झा-बर्गरवरबी बाबासायबांचीच सही हाय याची जाणीव ठेवलीय. हे प्रेम फक्त गाडीवर 'जयभीम' लिहिण्यापुरतं नाय बरं का... आपल्यापैकी बर्याचजनांना वाटंल, त्यात काय विशेष? लै जन अशी महामानवांची नांवं गाडीवर लिहीत्यात. म्हनून त्यापुढं जाऊन या मानसाविषयी मी जानून घेतलं, आन् नंतर खर्या अर्थानं भारावलो. आज ऑस्ट्रेलियात व्यवसाय भरभराटीच्या शिखरावर असूनबी अमितनं बाबासाहेबांचा आदर्श घेत, सामाजिक भान जपलंय. इंडीयामधल्या उपेक्षित, वंचित समाजातल्या हुशार पोरांना हेरून, त्यांना करीयर गायडन्स करनं... उच्च शिक्षनासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये संधी मिळवुन देनं, अशी कामं मनापास्नं आनि आनंदानं करतो हा आपला दोस्त! शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे 'खरेखुरे' विचार ज्यानं मनामेंदूत मुरवून घेतलेत, तो कुठल्याही क्षेत्रात जाऊदेत... कुठल्याही प्रांतात जाऊदेत... कुठल्याही देशात जाऊदेत... न डरता, न लाजता, कुनाचीबी भिडभाड न ठेवता आपल्या महामानवांच्या विचारांचा दरवळ पसरवनार... हे जग सुंदर करनार !",असंही किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Kiran Mane: "असा बापमाणूस साकारताना रोज जे समाधान मिळतंय..."; किरण माने यांनी शेअर केली खास पोस्ट