Telly Masala : समीर चौघुले आणि मधुराणी प्रभुलकर यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक ते हास्यजत्रेत ओंकार भोजनेची पुन्हा एन्ट्री; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
श्रीकांतची आई सुद्धा तुमची मालिका बघते, मुख्यमंत्र्यांकडून मधुराणीला दाद, मी समीर चौघुलेंचा फॅन, शिंदेंचे हास्यफवारे!
ठाणे: "समीर चौघुले (Samir Choughule) मी सुद्धा तुमचा फॅन आहे. वेळ मिळेल तेव्हा हास्यजत्रा हा कार्यक्रम बघतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दाद दिली. शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यात (Thane) आयोजित केलेल्या दिवाळी पहाट (Diwali Pahat) कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांचंही कौतुक केलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jhimma 2 Trailer: "फक्त आई होणं म्हणजे, बाई होणं नसतं"; 'झिम्मा-2'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Jhimma 2 Trailer: 'झिम्मा-2' (Jhimma-2) या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टीझर रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Nagraj Manjule: गार्गी कुलकर्णीची नागराज मंजुळेंच्या आयुष्यात कशी झाली एन्ट्री? जाणून घ्या लव्हस्टोरीबद्दल...
Nagraj Manjule: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा नाळ-2 हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं अनेकजण कौतुक करत आहेत. नागराज मंजुळे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Maharashtrachi Hasya: आता नुसता धिंगाणा होणार, हास्यजत्रेत ओंकार भोजनेची पुन्हा एन्ट्री; स्किटमध्ये म्हणाला "मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही"
Maharashtrachi Hasya: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) हा देशील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. पण ओंकारनं काही दिवसांपूर्वी हा शो सोडला होता. आता ओंकारची महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एन्ट्री झाली आहे. नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Madhurani Prabhulkar: "आमची दिवाळी अक्षरशः उजळून निघाली"; थेट मुख्यमंत्र्यांनी दाद दिल्यानंतर 'आई कुठे काय करते'च्या अरुंधतीची खास पोस्ट
Madhurani Prabhulkar: शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यात (Thane) आयोजित केलेल्या दिवाळी पहाट (Diwali Pahat) कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) तसेच समीर चौघुले (Samir Choughule) यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मधुराणी प्रभुलकर आणि समीर चौघुले यांचे कौतुक केले. नुकतीच मधुराणी प्रभुलकर यांनी खास पोस्ट शेअर करुन 'रंगाई दिवाळी पहाट' या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शाबासकीबद्दल सांगितलं.