Madhurani Prabhulkar: "आमची दिवाळी अक्षरशः उजळून निघाली"; थेट मुख्यमंत्र्यांनी दाद दिल्यानंतर 'आई कुठे काय करते'च्या अरुंधतीची खास पोस्ट
ठाण्यात (Thane) आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट (Diwali Pahat) कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांनी आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांचं कौतुक केलं.
Madhurani Prabhulkar: शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यात (Thane) आयोजित केलेल्या दिवाळी पहाट (Diwali Pahat) कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) तसेच समीर चौघुले (Samir Choughule) यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मधुराणी प्रभुलकर आणि समीर चौघुले यांचे कौतुक केले. नुकतीच मधुराणी प्रभुलकर यांनी खास पोस्ट शेअर करुन 'रंगाई दिवाळी पहाट' या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शाबासकीबद्दल सांगितलं.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
ठाण्यातील दिवाळी पहाट या कार्यक्रमात एकनाथ शिंदे हे मधुराणी प्रभुलकर यांना म्हणाले, "आई कुठे काय करते आपला कार्यक्रम अतिशय उत्तम सुरू आहे. श्रीकांतची आई (लता शिंदे) सुद्धा हा कार्यक्रम बघताना मी पाहायचो. कधी कधी मी पण पाहायचो. तुमची भूमिकाही उत्तम होती. तुमच्या विरोधातील भूमिका चांगली नव्हती. म्हणजे त्यांना जो रोल दिला तो त्यांनी केला. शेवटी पुरुषपण आमचे चांगले असतात"
मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केली पोस्ट
दिवाळी पहाट कार्यक्रमातील फोटो शेअर करुन मधुराणी प्रभुलकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "आजच्या 'रंगाई दिवाळी पहाट' ला खुद्द महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते. त्यांच्या समोर कविता ऐकवल्या , गझल गायली आणि त्यांची उत्स्फूर्त दाद आणि शाबासकी ह्यांनी आमची दिवाळी अक्षरशः उजळून निघाली."
View this post on Instagram
'आई कुठे काय करते' या मालिकेत मधुराणी प्रभूलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनेक ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. मिलिंद गवळी, निरंजन कुलकर्णी, अभिषेक देशमुख, अश्विनी महांगडे हे कालाकार देखील या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारतात. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
इतर महत्वाच्या बातम्या: