Nagraj Manjule: गार्गी कुलकर्णीची नागराज मंजुळेंच्या आयुष्यात कशी झाली एन्ट्री? जाणून घ्या लव्हस्टोरीबद्दल...
Nagraj Manjule: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे.
Nagraj Manjule: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा नाळ-2 हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं अनेकजण कौतुक करत आहेत. नागराज मंजुळे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे.
नागराज मंजुळे आणि गर्गी कुलकर्णी यांची लव्हस्टोरी (Nagraj Manjule Wife)
मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांची पत्नी गर्गी कुलकर्णीबद्दल (Gargee Kulkarni) सांगितलं. ते म्हणाले, "अहमदनगरला आम्ही भेटलो. गार्गीला वाचनाची आवड आहे. ती स्वत: कविता लिहिते. मी जेव्हा पटकथा लिहितो, तेव्हा मी ती कथा दोन-तीन व्याक्तींना ऐकवतो. त्यांच्या होकार, नकारामुळे किंवा कथेबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने मला कॉन्फिडन्स येतो. त्यामधील एक व्यक्ती गार्गी आहे, मी गार्गीला सगळ्या पटकथा ऐकवतो. गार्गीची सहित्याची समज चांगली आहे. गार्गी कविता खूप चांगली लिहिते. तिनं मोजकं लिहिलंय पण खूप चांगलं लिहिते."
पुढे नागराज यांनी सांगितलं "मी ज्या काही क्रिएटिव्ह गोष्टी करतो, त्यामध्ये गार्गीचा महत्वाचा वाटा असतो. ती माझा आरसा आहे."
View this post on Instagram
गर्गी ही चित्रपट निर्माती देखील आहे. सैराट (2016), झुंड (2022) आणि घर बंदुक बिर्याणी (2023). या नागराज यांच्या चित्रपटांची निर्मिती तिनं केली.
नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांच्या 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'फँड्री' या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच त्यांच्या सैराट या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.10 नोव्हेंबर रोजी त्यांचा नाळ-2 (Naal 2) हा चित्रपट रिलीज झाला आहे.'डराव डराव', 'भिंगोरी' या नाळ-2 या चित्रपटातील गाण्यांचे देखील अनेकांनी कौतुक केलं आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, श्रीनिवास पोकळे दीप्ती देवी आणि नागराज मंजुळे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: