Kiran Mane: "निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे, जागे रहा!" किरण मानेंची मराठा बांधवांसाठी पोस्ट
Kiran Mane: अध्यादेश समोर आल्यानंतर विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील अध्यादेशाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
Kiran Mane: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळालं आहे. सरकारने अध्यादेश जारी करत जरांगे यांच्यासह मराठा समाजाची मागणी मान्य केली आहे. अध्यादेशात मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी करण्यात आलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या, तरी हरकती नोंदवण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अध्यादेश समोर आल्यानंतर विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील अध्यादेशाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांची पोस्ट
किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "मराठा बांधवांनो, तहात हारू नका.'...सदर अध्यादेश 16 फेब्रूवारी 2024 पासून किंवा त्यानंतर लागू होईल.' आणि '...यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील." हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे. निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा. एक मराठा लाख मराठा" किरण माने यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
पहाटेपर्यंत चालेल्या मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाबाबत एकमत झाले. याबाबत सरकराने तातडीने जीआर देखील काढले आहेत. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, मुख्यमंत्री यांचे हस्ते ज्यूस पिऊन जरांगे यांनी आपले उपोषण संपवले.
किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. मराठा आरक्षणाबाबत देखील त्यांनी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रवेश केला. त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीची बरीच चर्चा देखील झाली.
View this post on Instagram
किरण माने यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” या मालिकेत अभिमान साठे ही भूमिका साकारली. किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: