Kiran Mane: हे तर कारण नसेल शंकराचार्यांच्या बहिष्काराचे? मनुस्मृतीचा उल्लेख करत किरण माने म्हणाले..
किरण माने (Kiran Mane) हे सध्या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. नुकतीच त्यांनी आयोध्येतील राम मंदिराबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रवेश घेतला होता. किरण माने यांच्या राजकारणातील एन्ट्रीची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. किरण माने हे सध्या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. नुकतीच त्यांनी आयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराबाबत (Ram mandir) एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
किरण माने यांची पोस्ट
किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं-राममंदिर उद्घाटन सोहळा अनेक गोष्टींची पोलखोल करणारा ठरलाय यात शंका नाही. जरा खोलात जाऊन सांगतो भावांनो. ज्या शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनावर बहिष्कार टाकलाय... त्यातले एक शंकराचार्य निश्चलानन्द सरस्वती महाराज यांनी मागे उघडपणे सांगीतले होते की, 'मनुस्मृती हे जगातलं पहिलं आणि एकमेव संविधान आहे. ओके. ठीके.आता या बहिष्काराचं कारण शोधण्यासाठी मी मनुस्मृती वाचली. त्यातल्या काही नियमांकडं माझं लक्ष गेलं... मनुस्मृतीच्या चौथ्या अध्यायात स्पष्टपणे सांगीतले आहे की, 'धार्मिक विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे. त्याव्यतिरीक्त कुणी शुद्राने ते करू नये. शुद्राला ते सांगूही नयेत. अन्यथा नरक भोगावे लागते. मी विचार करू लागलो, हे तर कारण नसेल शंकराचार्यांच्या बहिष्काराचे? दुसरं म्हणजे, पौष महिना म्हणे हिंदू धर्मात धार्मिक कार्यांसाठी अशुभ मानला जातो. त्या अंगाने पहायचं ठरवलं तर...याच चौथ्या अध्यायात मनुने हे ही स्पष्ट सांगीतले आहे की, 'धार्मिक कार्यात डामडौल, दिखाऊपणा करणारे, मुहुर्ताचे बंधन न पाळणारे हे सर्व नरकवासाच्या शिक्षेला पात्र आहेत.हे ही कारण असेल कदाचित.असो. एकंदरीत राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून होत आहे, त्यामुळे ही नाराजी आहे, असे सध्या तरी वाटतेय. नाही का? राजकिय फायद्यासाठी हे चाललेय असे धर्मगुरूंचे मत आहे. म्हणजे या लोकांचे मनुस्मृतीला उडवुन लावणे हे सामाजिक समता आणि न्यायासाठी नाही, असा त्याचा अर्थ होतो."