Kavya Anjali Sakhi Saavali : प्रेमाच्या नात्यात गुंफलेली दोन बहिणींची गोष्ट; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय नवी मालिका 'काव्यांजली सखी सावली'
Kavya Anjali Sakhi Saavali : 'काव्यांजली सखी सावली' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Kavya Anjali Sakhi Saavali Marathi Serial : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'काव्यांजली सखी सावली' (Kavya Anjali Sakhi Saavali) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाच्या नात्यात गुंफलेल्या दोन बहिणींची गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
'काव्यांजली सखी सावली' या मालिकेत काय पाहायला मिळणार? (Kavya Anjali Sakhi Saavali Marathi Serial Details)
'काव्यांजली' (Kavya Anjali Sakhi Saavali) अश्याच एकमेकींवर प्रेम करणाऱ्या दोन जिवाभावाच्या बहिणींची गोष्ट आहे. या दोघी चुलत बहिणी असल्या तरीदेखील त्यांचं नातं आई - मुलीसारखं आहे. अंजलीचा जन्म झाल्यापासून ती काव्याची मानसकन्या झाली. काव्याचं लग्न झाल्यावर अंजलीने घराची जबाबदारी उचलली.
काव्या सासरी सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चोख निभावते आहे. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, नवऱ्याच्या प्रेमासाठी, त्याच्याकडून मिळणाऱ्या थोड्या मानासाठी आसुसली आहे. ते आज न उद्या तिला मिळेल, या आशेवर ती जगतेय. अंजलीचं ठरलं आहे तिला विश्वजित सारखा नवरा नको आहे. ज्याला कुठेतरी काव्यादेखील समर्थन देत आहे. या दोन बहिणींच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवले आहे? अंजलीला तिच्या स्वप्नांचा राजकुमार मिळेल? काव्या अंजलीसाठी योग्य मुलगा शोधू शकेल? काव्या तिचा मान सासरी मिळवू शकेल? विश्वजित काव्याला आपलंस करेल? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेत मिळतील.
View this post on Instagram
दोन्ही बहिणींची ही अशी समांतर चाललेली नशीबं कुठे येऊन जुळतील का? दोघींनी एकमेकींच्या सुखी संसाराची जी स्वप्नं पहिली होती, ती पूर्ण होतील की धुळीला मिळतील? त्यांना त्यांच्या नवऱ्याचं प्रेम मिळेल? नात्यांमधल्या प्रेमाची त्यांची आस पूर्ण होईल का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेत मिळतील. 'काव्यांजली - सखी सावली' मालिकेमध्ये काव्या प्रेभुदेसाईची भूमिका कश्मीरा कुलकर्णी तर अंजली दिवेकर ची भूमिका प्राप्ती रेडकर साकारणार आहे.
- काव्यांजली - सखी सावली (Kavya Anjali Sakhi Saavali)
- कुठे पाहाल? कलर्स मराठी
- किती वाजता? सोम-शनि रात्री 8.30 वाजता
- कधी होणार सुरू? 29 मे
संबंधित बातम्या