एक्स्प्लोर

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

सातत्याने चित्रीकरण रद्द करुन कपिल शर्मा बॉलिवूड कलाकारांसोबतचे संबंध बिघडवत आहे.

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं आहे. 'द कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचलेले बादशाहोचे कलाकार अजय देवगण, ईशा गुप्ता, इम्रान हाश्मी आणि इलियाना डिक्रूज यांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागली. परंतु बराच वेळ वाट पाहूनही कपिल न आल्याने या कलाकारांना रिकाम्या हाती परतावं लागलं. सातत्याने चित्रीकरण रद्द करुन कपिल शर्मा बॉलिवूड कलाकारांसोबतचे संबंध बिघडवत आहे. बादशाहोची टीम परतल्यानंतर सनी देओल आणि बॉबी देओल हे सोमवारी 'पोस्टर बॉईज' सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार होते. परंतु कपिल शर्मा शूटिंग रद्द करेल की काय म्हणून त्यांनीच शोमध्ये न येण्याचा निर्णय घेतला.

कपिलला दारुचं व्यसन? सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्माला दारुचं व्यसन लागलं आहे. तो लेट नाईट पार्टी करतो, त्यामुळे सकाळी वेळेवर उठत नाही. त्याला आरोग्याशी निगडित काही अडचणी आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणी आणखीच वाढत आहेत. सुनील ग्रोव्हरसोबत विमानात झालेलं भांडणही दारुच्या नशेतच झालं होतं.

...म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?

किती शोचं शूटिंग रद्द? शूटिंग रद्द करण्याची सुरुवात 'जब हॅरी मेट सेजल'च्या प्रमोशनसाठी आलेल्या शाहरुख खान आणि अनुष्का शर्मापासून झाली. त्यानंतर 'मुबारकां'च्या प्रमोशनसाठी आलेल्या अर्जुन कपूर आणि अनिल कपूरसोबतही असंच काहीसं घडलं. 'गेस्ट इन लंडन'चं चित्रीकरणही तब्येतीच्या कारणामुळे रद्द केलं. परंतु नंतर अर्जुन आणि अनिल कपूर यांच्यासोबत पुन्हा शूटिंग केलं. मात्र शाहरुख अनुष्कासोबतच्या एपिसोडचं शूटिंग झालं नाही. याशिवाय कपिलने आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरला 5 तास वाट पाहायला लावलं होतं. श्रद्धाने निघून जाण्याची धमकी दिल्यानंतर तेव्हा कुठे कपिल शूटिंगसाठी आला.

'द कपिल शर्मा शो' बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?

...म्हणून चॅनलने करार वाढवला! कपिल शर्माचा शोमधील रस कमी झाला आहे, असं म्हटलं जात आहे. चॅनल त्याच्यासोबतचा करार वाढवणार नाही, असं चर्चा होती. पण कपिलची लोकप्रियता पाहता चॅनलने त्याचा करार वाढवला.

कॉमेडी स्टार कपिल शर्मा नेत्रदान करणार!

कपिलला चॅनलची नोटीस परंतु कपिलने मागच्या चुकांमधून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. आता संकटात सापडलेल्या चॅनलकडे टेलिकास्ट करण्यासाठी कोणताही एपिसोड नाही. एका वेबसाईटनुसार, चॅनलन कपिलला नोटीसही पाठवली आहे. कपिलने त्याची वागणूक सुधारावी अन्यथा परिणाम वाईट असू शकतील, असा इशारा त्याला देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget