एक्स्प्लोर

मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका

मुंबई: जगप्रसिद्ध पॉपसिंगर जस्टिन बिबरचा आज नवी मुंबईतल्या डी. वाय.पाटील मैदानात म्युझिक शो होणार आहे.  यानिमित्तानं 1996 साली आलेल्या मायकेल जॅक्सनच्या दौऱ्याच्याही आठवणी ताज्या होत आहेत. वयाच्या अवघ्या तेवीसीतच जस्टिन बीबर पॉप जगतातला तारा बनला. मात्र प्रसिद्धीबरोबरच वादांची मालिकाही त्याच्या पाठिमागे कायम राहिली.  सध्या जस्टिन बीबर चर्चेत आहे तो त्याच्या भारत दौऱ्यामुळे. मायकल जॅक्सननंतर आंतरष्ट्रीय पातळीवरचा एवढा मोठा स्टार जस्टिनच्या रुपानं भारतात येतोय. michael jackson, Justin Bieber म्हटलं जातंय की नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील मैदानावर होणारा जस्टिनचा शो एकाचवेळी 45 ते 50 हजार लोक पाहू शकणार आहेत. या कार्यक्रमासाठी 25 पोलीस अधिकारी, 500 पोलीस, 1200 खासगी सुरक्षारक्षकांचा फौजफाटाही तयार आहे. महत्वाचं म्हणजे जस्टिनच्या सुरक्षेचा ताफा अधिक चोख ठेवण्याची जबाबदारी सलमान खानचा बॉडिगार्ड शेरावर सोपवली गेली आहे. जस्टिनचा शो पाहण्यासाठी तिकिटांचा दर हा 4 हजारापासून ते तब्बल 77 हजार रुपये इतका आहे. मात्र, तरीही जस्टिनचं फॅन फॉलोईंग पाहता हा शो हाऊसफूल होईल, असा अंदाज आहे. जस्टिनच्या शोला ‘हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड’ या सिनेमात झळकलेली अभिनेत्री एरिलिका जॉनसन होस्ट  करणार आहे. एरिलिका जॉनसन स्वतःदेखील जस्टिन बीबर मोठी चाहती आहे. raj Thackeray & michael jackson 1996 साली अशाच एका बड्या कलाकाराचा शो चर्चेत आणि वादात राहिला होता. तो स्टार म्हणजे मायकेल जॅक्सन. ज्यावेळी मायकेल जॅक्सन भारतात आला. त्यावेळी जस्टिन बीबर अवघ्या 2 वर्षांचा होता. मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे त्याकाळात सत्तेत असलेल्या शिवसेनेचा पुढाकार होता.  या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी स्थापन झालेल्या शिवउद्योग सेनेकडे होती.  आणि मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामागे खुद्द राज ठाकरेंचा मोठा हात होता. Raj Thackeray, Sonali Bendre मायकेल जॅक्सन जेव्हा मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित राहिले होते.  खास मराठमोळ्या पद्धतीनं झालेल्या स्वागतामुळे मायकेल जॅक्सन भारावल्याची दृश्यं आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत.  विमानतळावरच्या स्वागतानंतर मायकेल जॅक्सननं बाळासाहेब ठाकरेंची राहत्या घरी भेटली. त्यानंतर भारताबद्दलच्या अनेक आठवणी मायकेल जॅक्सननं लिहून ठेवल्या होत्या. या दोन स्टार्सची तुलना यासाठी की दोघंही नेहमी वादात राहिले. मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामागे एका राजकीय पक्षाचा पुढाकार होता. म्हणून त्याकाळी प्रचंड टीकाही झाली. आता जस्टिननंही भारतात येण्यासाठी आयोजकांपुढे काही हास्यास्पद तर काही अशक्यप्राय अटी पुढे ठेवण्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. संबंधित बातम्या जस्टिन बिबर मुंबईत दाखल, कॉन्सर्टसाठी चाहत्यांची झुंबड सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड! 2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी

महत्त्वाच्या बातम्या

Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Mahabharat fame Actor: 'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
Aai Tuljabhavani: 'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट; दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?
'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट; दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Embed widget