एक्स्प्लोर
करण-बिपाशाच्या लग्नाबाबत जेनिफर म्हणाली...

मुंबई : टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने पहिला पती करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांच्या लग्नाबाबत अखेर मौन सोडलं आहे.
एका इंग्लिश वृत्तपत्राशी बोलताना जेनिफर म्हणाली की, "करण आणि बिपाशासाठी मी आनंदी आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही अढी नाही. बिपाशा आणि करण यांना माझ्याकडून शुभेच्छा. दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसते."
करणसिंग तिसऱ्यांदा बोहल्यावर, बिपाशाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
करण आणि माझ्या संसाराठी मी 500 टक्के प्रयत्न केला. त्यामुळे कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही. सध्या सिंगल आयुष्य आनंदाने जगत असल्याचं 'सरस्वतीचंद्र'मधील अभिनेत्री जेनिफरने सांगितलं. करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू 30 एप्रिल रोजी बंगाली पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत.आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























