Hina Khan : ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज, हिना खानची पहिली केमोथेरपी, शरीरावर काळे डाग; फोटो शेअर करत चाहत्यांसाठी प्रेरणादायी पोस्ट
Hina Khan Chemotherapy : अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. पहिल्या केमोथेरपीनंतर तिने फोटो शेअर केला आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (TV Actress) हिना खान (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सरशी (Breast Cancer) झुंज देत आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खानला कर्करोगाचं निदान झालं आहे. अभिनेत्रीने गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की, ती स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. हिना ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. हिना खानवर उपचारही सुरू आहेत. तिने काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधील एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता. आता हिना खानने पहिल्या केमोथेरपीनंतर तिच्या अंगावरील जखमांचा फोटो शेअर केला आहे.
हिना खानची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज
स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री हिना खान हिने पहिल्या केमोथेरपीनंतरचे फोटो शेअर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये हिनाच्या वेगळा प्रेरणात्मक अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या अंगावरील केमोथेरपीचे व्रण तिने अतिशय विश्वासाने दाखवत चाहत्यांसोबत प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे.
हिना खानची पहिली केमोथेरपी
हिना खान वयाच्या 36 व्या वर्षी ही अभिनेत्री स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराला बळी पडूनही तिने हिंमत हारलेली नाही. तिने नव्या उमेदीने लढाई सुरू केली आहे. नुकतीच हिनाने तिची पहिली केमोथेरपी घेतली आहे. यानंतरचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये केमोनंतर हिनाच्या शरीरावरील काळे डाग स्पष्ट दिसत आहेत.
हिना खानच्या शरीरावर काळे डाग
View this post on Instagram
फोटो शेअर करत चाहत्यांसाठी प्रेरणादायी पोस्ट
सध्या हिना खान कामातून ब्रेक घेतला असून पूर्णपणे उपचार भर देत आहे. हिनाची पहिली केमोथेरपी झाली आहे, ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोसोबतच हिनाने एक लांबलचक प्रेरणात्मक पोस्टही लिहिली आहे. केमोनंतर हिनाच्या शरीरावर अनेक काळे डाग दिसून येत आहेत. या फोटोसोब पोस्टमध्ये हिनाने लिहिलं आहे की, "या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय? माझ्या अंगावरचे डाग की डोळ्यातील आशा? डाग माझे आहेत, मी त्यांना प्रेमाने आपलसं करते कारण ते माझ्या पात्रतेचं, प्रगतीचं पहिलं लक्षण आहेत. माझ्या डोळ्यातील आशा माझ्या प्रेरणेचं प्रतिबिंब आहे, मी काळ्याकुट्ट बोगद्याच्या शेवटचा प्रकाश पाहू शकतेय. मी माझे उपचार योग्यप्रकारे घेत आहे आणि मी तुमच्यासाठीही प्रार्थना करत आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :