![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Debina Bonnerjee : ‘दुसऱ्या बाळासाठी जरा वाट बघायची’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री देबिना बॅनर्जीने दिलं सडेतोड उत्तर! म्हणाली...
Debina Bonnerjee : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) तिच्या प्रेग्नेंसीमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे.
![Debina Bonnerjee : ‘दुसऱ्या बाळासाठी जरा वाट बघायची’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री देबिना बॅनर्जीने दिलं सडेतोड उत्तर! म्हणाली... Debina Bonnerjee gives epic reply to the user who tries to troll her over second pregnancy Debina Bonnerjee : ‘दुसऱ्या बाळासाठी जरा वाट बघायची’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री देबिना बॅनर्जीने दिलं सडेतोड उत्तर! म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/f8a8e6bd36590d384b7f7569f33143091660875175295373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Debina Bonnerjee : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) तिच्या प्रेग्नेंसीमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. देबिना दुसऱ्यांदा आई होणार आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला आहे, त्यामुळे लोक तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीमुळे तिला ट्रोल करत आहेत. दरम्यान, अलीकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक सेशन आयोजित केले होते, ज्यामध्ये चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. या सेशनमध्ये लोकांनी देबिनाच्या प्रेग्नेंसीवर अनेक प्रश्न विचारले, ज्यांची तिने बेधडक उत्तरे दिली.
छोट्या पडद्यावरील चर्चित जोडी मानले जाणारे अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. मुलगी लियानाच्या जन्माच्या अवघ्या चार महिन्यांनंतर, या जोडप्याने ही आनंदाची बातमी जाहीर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
चाहत्यांच्या प्रश्नांना देबिनाची बेधडक उत्तरं
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर 'आस्क मी एनीथिंग' सेशन आयोजित केले होते, जिथे तिने तिच्या चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. काही यूजर्सनी तिला दुसऱ्यांदा आई होत असल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. तर, त्याचवेळी काहींनी तिच्या इतक्या लवकर गर्भधारणेवर प्रश्नही उपस्थित केले. अभिनेत्रीने त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका व्यक्तीने तिला विचारले की, ‘दुसऱ्या बाळाचा विचार करण्याआधी त्यांनी लियाना चौधरीला थोडा वेळ द्यायला हवा होता.’ यावर अभिनेत्रीने बेधडक उत्तर दिले आणि विचारले की, ‘ज्यांना जुळी मुले आहेत ते काय करतात?’
त्याचवेळी एका चाहत्याने देबिनाला असा सल्लाही दिला की, तिने दुसऱ्या बाळासाठी वर्षभर वाट पाहायला हवी होती. युजरने विचारले की, ‘मॅडम, तुम्हाला पहिल्या बाळाच्या जन्मासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तुम्हाला नाही वाटत का, की तुम्ही दुसऱ्या बाळासाठी किमान एक वर्ष तरी वाट पाहायला हवी होती?’ याला उत्तर देताना अभिनेत्रीने विचारले की, ‘जर माझ्यासोबत काही चमत्कार घडला असेल तर.. तुम्हाला काय सुचवायचे आहे, गर्भपात करावा का?’ काहींनी दुसऱ्या प्रेगन्सीवरून देबिनाला ट्रोल करण्याचा प्रयत्न देखील केला.
गर्भधारणेसाठी देबिनाने केला अनेक अडचणींचा सामना
दरम्यान, देबिनाने या वर्षी 3 एप्रिल रोजी पहिल्या मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव त्यांनी लियाना ठेवलं. महत्त्वाचं म्हणजे देबिना अनेक वर्षांपासून प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत होती. पहिल्या बाळासाठी देबिनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या गर्भधारणेसाठी ती पाच वर्षे प्रयत्न करत होती. पण तिला अनेक गुंतागुंतीतून जावं लागलं. पाच वेळा ती या प्रक्रियेत अपयशी ठरली.
तिने दोन IVF आणि आणि IUI उपचार घेतले होते. देबिनाच्या अनेक थेरपी देखील झाल्या होत्या. यामुळे ती निराश देखील झाली होती. अखेर लग्नाच्या 11 वर्षानंतर देबिनाला आई होण्याचं सुख मिळालं. 3 एप्रिल 2022 रोजी ती पहिल्यांदा आई बनली. पण म्हणतात ना देनेवाला जब भी देता देता छप्पर फाड के, असंच काहीसं देबिना आणि गुरमीतच्या आयुष्यात घडलं आहे. पहिल्या अपत्याच्या जन्माच्या चार महिन्यांनंतरच देबिनाला दुसऱ्यांदा आई होण्याची संधी मिळाली आहे.
हेही वाचा :
चार महिन्यांपूर्वी पहिल्या मुलीचा जन्म, देबिना आणि गुरमीत दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)