एक्स्प्लोर

Sharayu Sonawane On Zee Marathi Paaru Serial: 'कोणतीही पूर्व कल्पना निर्मात्यांनी दिली नव्हती...'; 'पारू' मालिका अर्ध्यातच बंद होण्याचं कारण नेमकं काय? अभिनेत्री हात जोडून म्हणाली...

Sharayu Sonawane On Zee Marathi Paaru Serial: झी मराठीवरील 'पारू' ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. या मालिकेनं जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण, 10 फेब्रुवारीनंतर अचानक ही मालिका बंद झाली. कथानक अर्ध्यातच सोडून मालिका बंद झाली.

Sharayu Sonawane On Zee Marathi Paaru Serial: झी मराठीवरची (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'पारू'नं (Paaru Marathi Serial) अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला, त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असूनही मालिका (Marathi Serial) का संपवली? बरं, कथानक अर्ध्यातच सोडून मालिका कशी संपवली? असे अनेक प्रश्न सर्वांना पडलेले. एवढंच काय तर, मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शिक करण्यात येणार होता, पण काही कारणास्तव तोसुद्धा प्रसारित करण्यात आला नाही, त्यामुळे चर्चांना आणखीनंच उधाण आलं. अनेकांनी तर 'पारू' मालिका अशी अर्ध्यातच बंद केल्यामुळे नाराजी व्यक्त केलेली. मालिकेवर भरभरून प्रेम केलेल्या प्रेक्षकांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झालेला. पण, नेमकं काय झालं? यामागचं कोणतंही कारण समोर आलं नव्हतं. तसेच, कुणीच नेमकं काय घडलं? यावर भाष्य केलं नव्हतं. अशातच आता 'पारू' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री शरयू सोनावणेनं (Actress Sharayu Sonavane) समोर येत, काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच, प्रेक्षकांची माफीसुद्धा मागितली आहे. 

झी मराठीवरील 'पारू' ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. या मालिकेनं जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण, 10 फेब्रुवारीनंतर अचानक ही मालिका बंद झाली. कथानक अर्ध्यातच सोडून मालिका बंद झाली. या मालिकेचा शेवटचा एपिसोडही प्रसारित करण्यात आला नाही. त्यामुळे प्रेक्षकही बुचकळ्यात पडले. अशातच आता यावर अभिनेत्री शरयू सोनावणेनं एक व्हिडीओ शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SharayuSonawane (@sharayusonawaneofficial)

अचानक मालिका बंद झाल्याबाबत अभिनेत्री शरयू सोनावणे काय म्हणाली? 

"नमस्कार! मी शरयू सोनावणे म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी पारू! खूप प्रतीक्षेनंतर मी हा व्हिडिओ माझ्या चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी शेअर करतेय. कारणंही तसंच आहे. मला गेल्या काही दिवसांपासून अनेक मेसेज, फोन कॉल्स येत आहेत. सगळे मला विचारत आहेत की, 'पारू' मालिका अचानक का बंद झाली? तर, मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की, 10 फेब्रुवारी 2026 रोजी 'पारू' मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. सातशे भागांच्या प्रवासात तुम्ही आम्हाला भरपूर साथ दिली, आमच्यावर भरभरून प्रेम केलंत…तुमच्या प्रेमामुळेच आम्ही इतक्या लांबचा पल्ला गाठू शकलो. सतत दोन वर्षे टीआरपी चांगला असूनही ही मालिका अचानक बंद होणं ही सर्वांसाठीच अनपेक्षित गोष्ट आहे आणि अर्थातच धक्कादायक गोष्ट आहे..."

शरयू सोनावणेनं प्रेक्षकांची माफीसुद्धा मागितली आणि पुढे म्हणाली की, "पारू मालिका बंद होतेय, याची पूर्व कल्पना आम्हाला निर्मात्यांकडून दिली गेली नव्हती. आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये असा कुठल्याच मालिकेचा शेवट झाला नाही. जसा पारू मालिकेचा झाला. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते. कारण पारू मालिकेचा शेवटचा भागही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. प्रदर्शित करू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणी आणि प्रोडक्शनमुळे या मालिकेचा शेवटचा भागही प्रदर्शित नाही झाला... पारू ही मालिका बंद झाली असली तरी आपलं नातं, तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्यासोबतच राहील. यासाठी मी कायमच तुमची ऋणी राहीन. लवकरच एका नव्या भूमिकेत, नव्या रुपात भेटू... खूप खूप आभार..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Riteish Deshmukh On Marathi Film Industry: 'महाराष्ट्रातच मराठीला दुसरं स्थान...'; रितेश देशमुखनं बोलून दाखवली खंत, विलासरावांची इच्छा सांगताना म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Embed widget