एक्स्प्लोर
सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!
मुंबई: मशिदीवरील स्पीकरमुळे होणाऱ्या त्रासाबाबत गायक सोनू निगमने ट्विट केल्यानंतर चांगलाच वाद उफाळला. मात्र मशिदींवरील लाऊडस्पीकरविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतलेल्या बाबू खान यांनी मात्र सोनू निगमची पाठराखण केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते बाबूभाईंच्या मते, "इस्लाममध्ये दर्गा किंवा मशिदीवरील लाऊडस्पीकरला कोणतेही स्थान नाही. कुराण ए शरीफच्या आयतनुसार, खऱ्या मनाने केवळ तोंडी अजानच मान्य आहे. त्यासाठी कोणत्याही लाऊड स्पीकरची गरज नाही"
बाबूभाईंनी मुंबईतील वांद्रे परिसरातील अनेक मशिदीत जाऊन, तिथल्या मुल्ला, मौलवी आणि मुस्लिम बांधवांना विनंती केली आणि लाऊड स्पीकर हटवले. इतकंच नाही तर बाबूभाई मुल्ला-मौलवींना मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देशही समजावून सांगतात.
सोनू निगमची पाठराखण
बाबूभाईंनी सोनू निगमने केलेल्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. इतकंच नाही तर सोनू निगमविरोधातील फतव्यांचीही निंदा केली आहे.
सोनू निगमचे ट्विट
‘मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल?’, असा सवाल गायक सोनू निगमनं केला होता. शिवाय, ‘मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?’, असंही सोनू निगमनं ट्वीटमधून विचारलं.
“जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही.”, असंही ट्वीट सोनू निगमनं केलं होतं.
सोनू निगमच्या या ट्वीटनंतर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळल्या. कोणी सोनूचं समर्थन केलं तर कुणी विरोध केला.
अजान म्हणजे काय?
नमाज अदा करण्याआधी मस्जिदमध्ये लोकांना बोलवण्यासाठी अजान दिली जाते. अजानचा अर्थ बोलावणं किंवा घोषणा करणं असा होतो. नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते.
संबंधित बातम्या:
मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम
‘अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही’, सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य
‘त्या’ ट्विटनंतर गायक सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement