Dance Maharashtra Dance : ज्यांचा कडक असेल डान्स त्यांना मिळेल चान्स; चिंचि चेटकीन शोधणार लिटिल मास्टर्स
Dance Maharashtra Dance : ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dance Maharashtra Dance : ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ (Dance Maharashtra Dance) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी लवकरच 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा कथाबाह्य कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम खास लहान मुलांसाठी असणार आहे.
चिंचि चेटकीण शोधणार लिटिल मास्टर्स
'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी छोट्या दोस्तांची आवडती चिंचि चेटकीण लिटिल मास्टर्स शोधणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये चिंचि चेटकीण म्हणत आहे,"मी शोधतेय महाराष्ट्राचे लिटिल मास्टर्स". या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या लहान मुलांचे (वयोगट ४ ते १५) डान्स व्हिडीओज हॅशटॅग डान्स महाराष्ट्र डान्स वापरून आणि झी मराठीला टॅग इंस्टाग्रामवर पोस्ट करायचे आहेत. चिंचि चेटकीण महाराष्ट्रातील धमाकेदार लिटिल मास्टर्स शोधून हा कार्यक्रम सादर करणार आहे. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
‘डान्स इंडिया डान्स’च्या ऑडिशनला सुरुवात
महाराष्ट्रातील बालकलाकार ‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या ऑडिशन होत आहेत. ऑडिशनद्वारे लिटिल मास्टर्सची निवड करण्यात येणार आहे. हे लिटिल मास्टर ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’चा किताब पटकवणार आहेत. या नव्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन आणि परीक्षकाची धुरा कोण सांभाळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'किचन कल्लाकार' घेणार निरोप
'किचन कल्लाकार' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहेत. या कार्यक्रमात प्रशांत दामले महाराज होते. पण त्यांची जागा आता निर्मिती सावंतने घेतली आहे. तर या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेची जागा श्रेया बुगडेने घेतली आहे. सध्या प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे नाटकांचे दौरे करत असल्याने 'किचन कल्लाकार' हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या