Kangana Ranaut : 'आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा'.. पंगा क्वीन कंगना रनौतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Kangana Ranaut : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut) वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. कंगनाने केलेलं वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच गाजत असतं. वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
What goes around comes around, karma.🙂#MahaVikasAghadi #UddhavThackeray 🐯 pic.twitter.com/di7j1iKDY4
— Harshal Badiyani (@HarshalBadiyani) June 21, 2022
गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना रनौत आणि शिवसेनेचा वाद चांगलाच रंगला होता. कंगनाच्या मुंबईतील घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पाडला होता. त्यामुळे कंगनाने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टिका केली होती. एक व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली होती,'आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा...याद रखना, ये एक जैसा नहीं रहता".
एका स्त्री चा तळतळाट नाही घ्यायचे अशी माझी आजी म्हणायची 😬🤐🤐🤐🤐🤐🤐😜#EknathShinde #एकनाथ_शिंदे #MaharashtraPoliticalCrisis #PresidentialElections @BJP4Maharashtra #BJP4Maharashtra #DevendraFadnavis
— ĞÁÙŘÀV🗨 (@gaurav_San) June 22, 2022
एक akela devendra kya karega?#PresidentialElections #KanganaRanaut pic.twitter.com/Tf9GqFQPdU
कंगना रनौतने म्हंटलेलं वाक्य आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, 'माझं घर तोडून माझा बदला घेतला असं वाटत आहे का. आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. सर्वच वेळ सारखी नसते हे लक्षात असूद्या.'
संबंधित बातम्या