एक्स्प्लोर
'माझ्यावर बंदी घालता येणार नाही', 'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेचा दावा
!['माझ्यावर बंदी घालता येणार नाही', 'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेचा दावा Cintaa Has No Right To Stop Me From Working Shilpa Shinde 'माझ्यावर बंदी घालता येणार नाही', 'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेचा दावा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/15153144/anguri-bhabhi-775x400-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: ‘भाभीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि मालिकेचा निर्माता बेनफेर कोहली यांच्यात दिवसेंदिवस वाद वाढतच आहे. त्यातच शिल्पावर आजीवन बंदी घालण्याच्याही काल बातम्या समोर येत होत्या.
बॅनच्या बातमीवर शिल्पा शिंदेचं म्हणणं आहे की, 'सिन्टा मला काम करण्यापासून रोखू शकत नाही. आता हे प्रकरण कोर्टात आहे. मला शोच्या निर्मात्यांनी एक नोटीस धाडली आहे. ज्यांच मी उत्तर दिलं आहे.'
शिल्पा म्हणते की, 'त्या लोकांनी मला कितीही घाबरविण्याचा प्रयत्न केला तरीही मी ही लढाई चालू ठेवेन.'
अंगुरी भाभीची भूमिका बरीच गाजते आहे. या शोचा टीआरपी देखील यांच्यामुळेच चांगला येतो आहे. शिल्पा चॅनलसोबत आणखी शो करीत होती. मात्र, तिला तसं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. तेव्हापासून हा वाद सुरु झाला आहे.
चॅनल आणि प्रोडक्शन हाऊसकडून त्रास देण्यात येत असून धमक्याही दिल्या जात आहेत. जर तिने दुसऱ्या कोणत्या चॅनलसोबत काम केलं तर करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा आरोप शिल्पानं केला आहे.
आम्हाला व्यवस्थित ड्रेस डिझायन, दागिने दिले जात नाही. आम्ही घरुनच बऱ्याचदा सगळ्या वस्तू घेऊन येतो. असं शिल्पाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे शोचा निर्मात बेनिफरचं म्हणणं आहे की, फी वाढवून न दिल्यानं हे असे आरोप केले जात आहेत. मध्येच सीरीयल सोडण्याची धमकी दिल्यानं शिल्पाविरोधात तक्रार करण्यात आली होती.
सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टा शिल्पावर आजीवन बंदी घालण्याच्या विचारात आहे. पण आता सिन्टाचे संयुक्त सचिव अमित बहलचं म्हणणं आहे की, शिल्पा असोसिएसशनची सदस्या आहे. त्यामुळे आमचं तिला संपूर्ण समर्थन आहे. तसेच 1 मेला सिन्टाची वार्षिक बैठक होणार आहे. ज्यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
सिन्टाने बंदी घालण्यापूर्वी शिल्पाच्या हातातून कपिल शर्माचा शो गेला, असं टीव्ही जगतातील जाणकारांचं मत आहे.
![anguri-bhabhi8-775x400](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/15153153/anguri-bhabhi8-775x400-300x199.jpg)
![anguri-bhabhi6-775x400](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/15153151/anguri-bhabhi6-775x400-300x155.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)