(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi Season 5 : 'हे सॉरी म्हणजे चेहऱ्यावरच्या मेकअपचा फक्त एक लेअर', वर्षाताईंना मातृत्वावरुन बोलल्यानंतर रितेशने निक्कीला सुनावले खडेबोल
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीमध्ये निक्कीच्या बोलवण्यावरुन पुन्हा एकदा रितेशने तिची चांगलीच शाळा घेतली असल्याचं पाहायला मिळालं आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) आणि निक्की (Nikki Tamboli) यांचे वाद पहिल्या आठवड्यापासून चर्चेचा विषय ठरत आहेत. पहिल्या आठवड्यात निक्कीने वर्षा उसगांवकर यांच्यासाठी जे शब्द वापरले त्यावरुनही बराच संताप प्रेक्षकांनी व्यक्त केला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही निक्की आणि वर्षा उसगांवकरांसोबतचा वाद आणि त्यामध्ये जान्हवीची उडी देखील विशेष गाजली. पण या आठवड्यात निक्कीने वर्षाताईंच्या मातृत्वावरुन त्यांना ऐकवलं. त्यानंतर मात्र अनेकांनी तिच्यावर जोरदार टीका केली आणि भाऊच्या धक्क्यावर रितेशने तिची चांगलीच शाळा देखील घेतली.
बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये घरातल्या स्पर्धकांना बाळाचा टास्क देण्यात आला होता. यामध्ये घरात आलेल्या दोन पाहुण्यांची काळजी घरातल्या मंडळींना घ्यायची होती. पण या टास्कमध्ये घरातले स्पर्धक नापास ठरल्याचं बिग बॉसने म्हटलं आणि हा टास्क थांबवला. त्यानंतर घरातल्या स्पर्धकांची आपआपसातही बरीच वादावादी झाली. पण त्यावेळी निक्कीने वर्षा उसगांवकरांवर केलेल्या टीप्पणीची महाराष्ट्रात चर्चा झाली आणि संतापही व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं.
तुमचं सॉरी मेकअपचा फक्त एक लेअर - रितेश देशमुख
निक्कीला झापताना रितेशने म्हटलं की, यावेळी जे तुम्ही वर्षाताईंना म्हणालात ना, त्यासाठी माफी नाही. तुम्ही म्हणालात वर्षाताई तुम्हाला आईच्या भावना कश्या कळणार. तुम्ही कुणाच्यातरी मातृत्वावर बोलला आहात. तुम्हीही एक स्त्री आहात, तुम्हालाही त्या भावना कळायला हव्यात. तुम्हाला जर आमच्या बिग बॉस मराठीमध्ये माफी मागायचं नाटक करायचं असेल ना तर खुशाल करा. कारण सगळ्यांना कळतंय, की हे फक्त एक नाटक आहे. सॉरी म्हणणंही तुमच्या चेहऱ्यावर जो मेकअप आहे त्यावरचा एक लेअर आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय.
'निक्कीचा बिग बॉस'
घरात निक्कीचा बिग बॉस सुरु असल्याचं म्हणत निक्कीची चांगलीच शाळा रितेशने घेतली. त्याने म्हटलं की, बिग बॉस मराठीच्या घरात निक्कीचा एक वेगळा बिग बॉस सुरु आहे आणि त्यामध्ये आमचा बिग बॉस मराठी चालूच आहे. पण निक्कीच्या बिग बॉसमध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीचा वाट्टेल तसा अपमान करु शकता. वाट्टेल त्या थराला जाता आणि नंतर सॉरी म्हणता. आमच्या बिग बॉस मराठीमध्ये सॉरी बोलायला लागेल असं वागायचच नसतं. पण तुम्हाला ते जमणार नाही. कारण तुमचा निक्कीचा बिग बॉस सुरु आहे. खेळा तुम्ही निक्कीचाच बिग बॉस खेळा. इतक्या वेळा सॉरी म्हणू नका की, एक दिवस प्रेक्षक तुम्हाला सॉरी म्हणतील आणि या बिग बॉस मराठीतून तुम्हाला बाहेर काढतील.तुमचं एक ठरलेलं आहे, रागाच्या भरात मला जे बोलायचं आहे बोलेन आणि नंतर सगळं शांत झालं की सॉरी म्हणेन.
View this post on Instagram