Vaibhav Chavan : अंकिताची मराठी कळत नाही मग इरीनाची कशी कळते? मालवणी भाषेवर केलेल्या वक्तव्यावरुन रितेशने वैभवला झाप झाप झापलं
Vaibhav Chavan : वैभव चव्हाणने मालवणी भाषेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन रितेशने त्याची चांगलीच शाळा घेतली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) बाळाचा टास्क खेळताना घरातील सदस्यांच्या दोन टीम करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दोन्ही टीमनी समोरच्या टीमचे अनेक मुद्द्यावरुन मार्क कापले. यावेळी वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अंकिता बाळाला खेळवताना मालवणी भाषा बोलत होती. त्यावरुन मालवणी ही मराठी भाषा नाही, असं म्हणत वैभवने तिचे मार्क कापले. त्यानंतर सोशल मीडियावर वैभववर रोष व्यक्त करण्यात आला.
याच मुद्द्यावरुन रितेशनेही भाऊच्या धक्क्यावर वैभवला झाप झाप झापलं आहे. त्याचप्रमाणे जर तुला अंकिताची मराठी कळत नाही मग इरीनाची मराठी कशी कळते असा सवाल देखील उपस्थित केला आहे. दरम्यान रितेशने कानउघडणी केल्यानंतर वैभवने अंकिताची माफी देखील मागितल्याचं पाहायला मिळालं.
मालवणी आणि मराठीमध्ये तुम्ही रेष उभी केलीत - रितेश देशमुख
रितेशने धनंजय, घन:श्याम या सगळ्यांना विचारतो की तुमच्या भागात कोणती भाषा बोलली जाते. त्यावर धनंजय बोलतो की, आमच्याकडे कोल्हापुरीच बोलली जाते. घन:श्याम म्हणतो की, आमच्याकडे नगरी भाषा बोलली जाते. त्यावर रितेश अंकिताला म्हणतो की, मला तुमची मालवणी कळते आणि तिच्यासोबत मालवणी भाषेत बोलतो. पुढे रितेश वैभवला म्हणतो की, तुम्हाला सांगितलं जात होत की, मालवणी ही बोलीभाषा आहे. पण तुम्हाला फक्त संचालक म्हणून मार्क कापायचे होते. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून उतरले आहात. तुम्ही एकीकडे इरीनाला मराठी शिकवता आणि दुसरीकडे मालवणी मराठी नाही असं म्हणता. तुम्हाला जर अंकिताची मराठी कळत नाही मग इरीनाची मराठी कशी कळते, असा प्रश्न विचारला.
वैभवने मागितली सगळ्यांची माफी
वैभवने या सगळ्यानंतर अंकिता आणि महाराष्ट्राची माफी मागत म्हटलं की, माझ्या मनात नव्हतं, असा भेदभाव करायचं. माझ्या खरंच असं काही मनात नव्हतं की, इतरांची मनं दुखावतील. त्यावर रितेशने म्हटलं की, आपल्याला माफी मागावी लागेल अशी वक्तव्यच करु नयेत.