एक्स्प्लोर
धक्कादायक! 'बिग बॉस'मधून 'ही' स्पर्धक बाद
अभिनेत्री रेशम टिपणीस बिग बॉसमधून बाद झाल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
मुंबई : 'बिग बॉस मराठी' च्या शेवटच्या आठवड्यात धक्कादायक एलिमिनेशन झाल्याची माहिती आहे. अभिनेत्री रेशम टिपणीस बिग बॉसमधून बाद झाल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. रविवारी रात्री हा भाग प्रक्षेपित होणार असून या चर्चांमुळे रेशमच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
चाहत्यांच्या मतानुसार रेशम टिपणीस ही बिग बॉसच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. सुरुवातीला राजेश शृंगारपुरेसोबत तिच्या असलेल्या 'केमिस्ट्री'मुळे घरातील सदस्य आणि प्रेक्षकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. राजेशच्या एलिमिनेशननंतर मात्र रेशम इतर सदस्यांसोबत खेळीमेळीने वागायला लागली.
रेशम घरात किचनमध्ये हातभार लावत नाही, टास्कमध्येही तिचा सहभाग नसतो, असा आरोप मेघा, सई वारंवार करत होत्या. रेशम 'राणी' असून कायम ऑर्डर सोडत असल्याची कुजबूजही मेघा-सईच्या गटात व्हायची.
बैलगाडीचं नॉमिनेशन टास्क या आठवड्यात स्पर्धकांना देण्यात आलं होतं. बैलगाडीवर बसून राहणारे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यानुसार रेशम, आस्ताद आणि स्मिता हे तिघे जण नॉमिनेट होते.
या आठवड्यात सूत्रसंचालक महेश मांजरेकर पत्नी मेधा यांच्यासह बिग बॉसच्या घरात सदस्यांना सरप्राईज देण्यासाठी सहभागी झाले होते. त्याआधी बिग बॉस हॉटेल, बिग बॉस बर्थडे पार्टी असे टास्क स्पर्धकांना देण्यात आले होते.
बिग बॉसच्या घरात आता सहा स्पर्धक राहिले आहेत. 'तिकीट टू फिनाले' या टास्कमध्ये विजयी झाल्यामुळे अभिनेता पुष्कर जोग थेट ग्रँड फिनालेमध्ये दाखल झाला आहे. पुष्करच अंतिम फेरीपर्यंत घराचा कॅप्टन असेल.
पुष्करसोबत मेघा धाडे, सई लोकूर, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर आणि शर्मिष्ठा राऊत असे सहा स्पर्धक सध्या बिग बॉसच्या घरात आहेत. शर्मिष्ठा 40 दिवसांनंतर वाईल्ड कार्ड म्हणून सहभागी झाली होती.
सहा जणांपैकी ग्रँड फिनालेमध्ये किती जण दाखल होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुढच्या आठवड्यातच ग्रँड फिनाले असल्यामुळे त्यापूर्वीही एलिमिनेशन होणार का, याबाबत संभ्रम आहे.
आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी (वैद्यकीय कारण), जुई गडकरी, सुशांत शेलार (वैद्यकीय कारण), त्यागराज खाडिलकर (वाईल्ड कार्ड), भूषण कडू, उषा नाडकर्णी, नंदकिशोर चौगुले (वाईल्ड कार्ड) आणि रेशम टिपणीस असे 12 स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली.
संबंधित बातम्या :
'बिग बॉस मराठी'च्या घरातून नंदकिशोर चौगुले बाद
'बिग बॉस मराठी'च्या विजेत्याला मिळणार...
म्हणून 'बिग बॉस'च्या घरात पुष्कर बिकीनीमध्ये फिरतोय
बिग बॉस मराठी : नंदकिशोरने मेघाला बुटावर नाक घासायला लावलं
बिग बॉस मराठी : पुनरागमनावर ऋतुजाची इन्स्टाग्राम पोस्ट
बिग बॉस : आस्ताद, मेघाला हरवत पुष्कर कर्णधार बनला
हे 'बिग बॉस मराठी'चं घर नाही, बस आहे...
बिग बॉस मराठी : अभिनेता सुशांत शेलार घराबाहेर
बर्थ डे स्पेशल : मेघा धाडेबद्दलच्या रंजक गोष्टी
'मराठी बिग बॉस'मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री
बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे
राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर
बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद
रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार
बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते
बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला दमदार सुरुवात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement