Rohit Patil on BJP: भाजपची सांगलीत इशारा सभा अन् ‘विकृतीचा रावण जाळूया’ कार्यक्रमावर आमदार रोहित पाटलांचा जोरदार पलटवार; म्हणाले, रावणाला..
आमदार रोहित पाटील यांनी तासगाव येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पंचनामे, अनुदान वाढवून मदत, रोजगार हमी योजना सुरू करण्याची मागणी केली.

Rohit Patil symbolic hunger strike: आमदार रोहित पाटील यांनी (Rohit Patil Tasgaon protest) तासगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाच्या माध्यमातून आमदार रोहित पाटील यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासह अनेक मागण्या सरकारकडे मांडल्या. अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट पंचनामे करण्यात यावेत, शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी (Maharashtra farmer loan waiver demand) करण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, नुकसान भरपाईची अनुदान रक्कम वाढवून मिळावी, शेतकरी बांधवांची सर्व कर्जाची बँक वसुली, तसेच शैक्षणिक व महसुली कर वसुली थांबवावी, सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या सर्व निराधार पेन्शनची रक्कम त्वरित मिळावी, शासनाने थांबवलेली रोजगार हमी योजनेची कामे पूर्ववत सुरु करावीत अशी मागणी रोहित पाटील यांनी या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून सरकारकडे केली.
अहंकारच रावणाला मारताना आज बघायला मिळेल (Rohit Patil criticism on BJP sangli rallies)
भाजपच्या सांगलीमधील इशारा सभा आणि ‘विकृतीचा रावण जाळूया’या कार्यक्रमावर आमदार रोहित पाटील यांनी टीका केली. रावणाला रामाने नाही तर रावणाच्या अहंकाराने मारलं होतं, कदाचित तीच प्रतिकृती आज पुन्हा बघायला मिळेल. त्यामुळे अहंकारच रावणाला मारताना आज बघायला मिळेल असे म्हणत आमदार रोहित पाटील यांनी भाजपच्या आज सांगलीत होणाऱ्या विकृतीचा रावण जाळूया’या कार्यक्रमावर टीका केली.
दिशाभूल करून दिशाहीन करण्याचं काम (Rohit Patil criticism on BJP)
अतिवृष्टीत मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असताना देखील राज्यात आज कोट्यवधी रुपये सगळ्या मेळाव्यांचे नियोजनासाठी खर्च केले जात आहेत. ठाणे, मुंबई, पुण्यामध्ये सत्ताधारी लोकांच्याच पक्षाच्या सर्व लोकांकडून दांडिया आणि गरब्याचे इव्हेंट्स भरवले जातात. कोट्यवधी रुपये त्याच्यावर खर्च केले जातात. हा सगळा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे, शेतकरी वर्गाचे जीवनमान उंचावलं पाहिजे, यासाठी यांनी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची या काळात खरंतर आवश्यकता होती असे आमदार रोहित पाटील म्हणाले. मात्र, राज्यातील जनता यावर निश्चितपणाने विचार करेल आणि येत्या काळामध्ये याला उत्तर दिल्याशिवाय लोक स्वस्त बसणार नाहीत असेही रोहित पाटील म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते बॅनर लावले कुणी किंवा त्याचा खर्च काय आला त्याचा तपशील अद्यापही पुढे आलेला नाही, पण इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च आज महाराष्ट्रामध्ये केला जातोय, लोकांची दिशाभूल केली जाते आणि समाजाला दिशाहीन करण्याचं काम शासन सातत्याने करतेय असे रोहित पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























