एक्स्प्लोर

Gold Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात

Dasara Gold Rate: विजयादशमीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

पुणे : विजयादशी दसरा (Dasara) म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि शुभ मुहूर्त असल्याने गाडी, घर आणि सोनं खरेदीसारख्या महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यात येतात. त्यामुळे, गाडीचे शोरुम, घराचे प्रकल्प आणि सोन्याच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी असते. यंदा सोन्याच्या दराने लाखांचा टप्पा अगोदरच गाठला असतानाही, आता सोनं (Gold) खरेदीसाठी ग्राहक दुकानात गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, सोन्याचे आजचे दर काय आहेत, सोनं आणखी किती महागलंय, याची उत्सुकता देखील सर्वांनाच लागून आहे. त्यामुळे, आज एबीपी माझाने पुण्यातील (Pune) सराफा बाजारात जाऊन सोन्याचे प्रति तोळा दर जाणून घेतले आहेत. तसेच, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोनं किती रुपयांनी महाग झालंय, हेही माहिती घेतली आहे.

विजयादशमीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या 8 दिवसात सोन्याच्या किंमती 10 ते 12 हजार रुपयांनी वाढल्या आहेत. जगातील अनेक देशात सुरू असलेले युद्ध , अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याचं मत आता तज्ज्ञांकडून व्यक्त होतं आहे. सणांचा कालावधी सुरू झाल्याबरोबरच सोनं खरेदीला सुरुवात होते आणि ते होत असताना सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या दरात झालेली ही वाढ, ग्राहकांसाठी मात्र काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक ठरत आहे. मात्र, तरीही ग्राहक शुभ मुहूर्त साधत सणासुदीला नक्कीच सोनं खरेदी करतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी सोनं खरेदीचा उद्याचा एक चांगला मुहूर्त आहे, त्यामुळे सोनं खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सराफ बाजारातील विक्रेत्यांना आहे. फतेचंद रांका सराफ यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता त्यांनी सोन्याच्या दराबाबत माहिती दिली. त्यानुसार, 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 1 लाख 21 हजार रुपये एवढा आहे, म्हणजेच गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सोन्याच्या दरात तब्बल 44 हजारांनी महागले आहे.

काय आहेत आज सोन्या-चांदीचे दर (Gold rate today)

सोने: 1 लाख 21 हजार (10 ग्राम)

चांदी: 1 लाख 51 हजार (1 किलो)

गतवर्षी 2024 मध्ये विजयादशमीला काय होते सोन्या चांदीचे दर (Gold rate 2024)

सोने: 76 हजार (10 ग्रॅम)

चांदी: 93 हजार (1 किलो)

हेही वाचा

मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget