Vishal Nikam : ज्योतिबाची भूमिका ते बिग बॉस; सांगलीकर विशाल निकमचा भन्नाट प्रवास
Bigg Boss Marathi 3 Winner Vishal Nikam : विशाल निकम ठरला बिग बॉस मराठी सिझन-3 चा विजेता. जाणून घेऊयात त्याच्याबद्दल खास गोष्टी...
Bigg Boss Marathi 3 Winner Vishal Nikam : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा (Bigg Boss Marathi 3) काल (रविवार) ग्रँड फिनाले पार पडला. विशाल निकम (Vishal Nikam) , जय दुधाणे (Jay Dudhane), उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) , विकास पाटील (Vikas Patil ) आणि मीनल शहा (meenal shah) हे पाच स्पर्धक अंतिम फेरीमध्ये गेले होते. या स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. जय दुधाने आणि विशाल निकम हे 'बिग बॉस मराठी सिझन 3' चे टॉप 2 सदस्य होते. त्यातून विशाल निकम या पर्वाचा महाविजेता झाला आहे. विशालने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जाणून घेऊयात विशालबाबत काही खास गोष्टी...
विशालचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. तो मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा आहे. विशालने सांगलीतील विटा येथून भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिथुन या चित्रपटामध्ये विशालने महत्वाची भूमिका साकारली. 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेतील विशालच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेमुळे विशालला लोकप्रियता मिळाली. तसेच 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेमध्ये देखील विशालने महत्वाची भूमिका साकारली.
View this post on Instagram
विशाल निकमला 20 लाख धनराशी आणि ट्रॉफी मिळाली आहे. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला.
संबंधित बातम्या
Happy Birthday Salman Khan : बॉलिवूडचा दबंग स्टार झाला 56 वर्षांचा, जाणून घ्या भाईजानचे फेमस डायलॉग'