(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi 3 : घरामध्ये रंगणार भन्नाट टास्क
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात कालच्या कॅप्टनसी टास्कनंतर आज एक भन्नाट टास्क रंगणार आहे.
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे आगळावेळा टास्क. हा टास्क खेळण्यासाठी घरातील सदस्य सज्ज आहेत. पूर्ण तयारी करून घरातील सदस्य या टास्कसाठी मैदानात उतरणार आहेत. एकीकडे नृत्य तर दुसरीकडे विकासचा पपेट शो रंगणार आहे. या टास्क दरम्यान गायत्री आणि मीराचे जोरदार भांडण देखील होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी गायत्रीला तिचा निकाल जाहीर करण्यास सांगितला आहे.
View this post on Instagram
आज रंगणाऱ्या टास्कमध्ये विकास सूत्रसंचालन करणार आहे. टास्क दरम्यान घरातील सदस्य धम्माल मस्ती करताना दिसणार आहे. गायत्री आणि मीरामध्ये टास्क दरम्यान जोरदार भांडण होताना दिसणार आहे. बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना दोन टिम्समध्ये विभागले आहे म्हणजेच 'टीम A' आणि 'टीम B'. कोणती टीम विजयी ठरणार याचा निकाल गायत्री लावणार, असे प्रोमोमध्ये दिसून येते आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन्सी टास्क पार पडला. जय आणि मीरा या दोन कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये हा टास्क रंगला. यामध्ये जय विजयी ठरल्याने घरचा कॅप्टन होण्याचा बहुमान या आठवड्यात त्याला मिळाला आहे. टास्क दरम्यान विशाल आणि विकासचे भांडण झाले होते. विकासचे वागणे, त्याचे बोलणे सोनालीला काही दिवसांपासून खटकत आहे. आज मीनल आणि सोनाली घरात घडणार्या, ग्रुप मध्ये घडणार्या गोष्टींवर चर्चा करताना दिसणार आहेत. सोनाली आणि मीनलच्या चर्चेनंतर, मीनल विकासला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण, विकासला कुठेतरी तिचे म्हणणे पटत नाही आहे, असे दिसून येते आहे.
संबंधित बातम्या
Phone Bhoot : Katrina Kaif, Siddhant Chaturvedi चा आगामी 'फोन भूत' सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Antim : 'सूर्यवंशी' नंतर Salman Khan च्या 'अंतिम'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha