Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता' मालिकेसाठी अंकिता लोखंडेला किती मानधन मिळालेलं? 'बिग बॉस'च्या घरात सांगितली स्ट्रगल स्टोरी
Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेने 'बिग बॉस'च्या घरात आपल्या स्ट्रगल स्टोरीवर भाष्य केलं आहे.
Ankita Lokhande Struggling Days : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमातील स्पर्धक आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) 'बिग बॉस'च्या घरात आपली स्ट्रगल स्टोरी आणि पहिल्या मानधनावर भाष्य केलं आहे.
अंकिता लोखंडेने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये 17 वर्षे पूर्ण केली आहेत. दरम्यान मुनव्वरसोबत बोलताना अंकिता म्हणाली,"एकेकाळी माझ्याकडे खरचं पैसे नव्हते. जेवणाचा प्रश्न सोडवायचा की ऑडिशनला जायचं हेच कळत नव्हतं. आई-वडिलांकडून सारखे पैसे मागणं मला पटत नव्हतं".
'पवित्र रिश्ता'ने अंकिताला मिळाला ब्रेक
'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेमुळे अंकिताला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला आहे. याबद्दल बोलताना अंकिता म्हणाली,"पवित्र रिश्ता' या मालिकेसाठी मला प्रति दिन 2000 रुपये मिळत होते. ज्यावेळी पहिल्यांदा माझ्या अकाऊंटमध्ये 50 हजार रुपये क्रेडिट झाले त्यावेळी मला खरचं खूप आनंद झाला होता. त्याआधी कधीच मी एवढे पैसे पाहिले नव्हते. त्यावेळी माझे पालकच माझी ताकद होते".
सुशांत सिहं राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी पूर्णपणे तुटले होते. त्यावेळी लोक म्हणत असे की,आता अंकिताचं कसं होणार? कोण लग्न करणार हिच्यासोबत? पण या दिवसांमध्ये मला आई-वडिलांचा खूप पाठिंबा मिळाला. ब्रेकअपमधून बाहेर पडायला मला दीड वर्षे लागली. पण आता विकी माझं जग आहे".
'पवित्र रिश्ता' मालिकेबद्दल जाणून घ्या...
'पवित्र रिश्ता' या मालिकेचा समावेश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये केला जातो. एकता कपूरने या मालिकेची निर्मिती केली होती. 2009 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मुख्य भूमिकेत होते. अंकिता आणि सुशांतची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. मालिकेदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते वेगळे झाले.
'या' कारणाने झाला अंकिता अन् सुशांतचा ब्रेकअप
ब्रेकअपबद्दल बोलताना अंकिता म्हणाली,"सुशांत आणि माझ्या ब्रेकअपचं विशेष असं कारण नाही. सुशांतने मला ब्रेकअपचं कारण सांगितलेलं नव्हतं. त्याने जर मला कारण सांगितलं असतं तर गोष्ट वेगळी होती. कदाचीत त्यातून मार्ग काढता आला असता. पण त्यावेळी त्याचं करिअर खूपच चांगलं सुरू होतं. दरम्यान अनेकांना त्याचे कान भरले. पण अखेर निर्णय त्याचा होता. मी कोणत्या गोष्टीसाठी त्याला थांबवलं नाही".
संबंधित बातम्या