एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : अब्दु रोजिकच्या विरोधात उभे ठाकले ‘बिग बॉस 16’चे स्पर्धक, टास्क दरम्यान पाडलं एकटं!

Bigg Boss 16 : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा 16वा (Bigg Boss 16) सीझन सुरू झाला आहे. यंदाचा सीझनदेखील नेहमीप्रमाणे खूपच मनोरंजक आहे.

Bigg Boss 16 : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा 16वा (Bigg Boss 16) सीझन सुरू झाला आहे. यंदाचा सीझनदेखील नेहमीप्रमाणे खूपच मनोरंजक आहे. यावेळी स्पर्धकांसोबत बिग बॉसनेही खेळाच्या मैदानात प्रवेश केला आहे. हा रिअॅलिटी शो घरात होणाऱ्या वादांसाठीही प्रसिद्ध आहे. यावेळीही अनेक प्रसिद्ध चेहरे या शोमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, लहानगा दिसणारा अब्दु रोजिक (Abdu Rozik) या सीझनचा आकर्षण बिंदू ठरला आहे. आपल्या निरागसपणाने तो प्रेक्षकांची मने जिंकत असला, तरी नुकत्याच पार पडलेल्या टास्कमध्ये स्पर्धकांनी त्याच्या विरोधात कट रचत त्याला एकटे पाडले आहे.

‘बिग बॉस 16’ सुरु होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. मात्र, अवघ्या चार दिवसांत हे घर दोन भागात विभागले गेले आहे. टीना दत्ता, निमृत कौरसारखे स्पर्धक आधीच घरामध्ये स्वतःचा गट तयार करताना दिसत आहेत. हे स्पर्धक आपल्या गटात केवळ अशाच स्पर्धकांना सामील करत आहेत, जे त्यांना आगामी काळात नामांकनापासून वाचवू शकतात. अवघ्या 4 दिवसांत या स्पर्धकांनी केवळ बिग बॉसच नव्हे तर, घरातील सदस्यांना देखील त्रास देण्यास सुरुवात केली आहे. आता स्पर्धकांनी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्पर्धक अब्दु रोजिक विरुद्ध गेम खेळला आहे.

पहिल्याच टास्कमध्ये अब्दु पडला एकटा!

‘बिग बॉस 16’मध्ये नुकताच घराचा पहिला टास्क खेळला गेला. यात घरातील सर्व सदस्य दोन वेगवेगळ्या टीममध्ये सामील झाले होते. ‘बिग बॉस’ने अब्दु रोजिक आणि एमसी स्टॅन असे दोन संघ बनवले आणि शिवा व सुंबूल यांना त्या संघांचे मॅनेजर बनवले. शिव आणि सुंबुलला घरातील इतर सदस्यांना अब्दु आणि एमसी स्टॅनच्या टीममध्ये सामील होण्यासाठी राजी करायचे होते. आपल्या टीममध्ये अधिकाधिक लोक येऊन परफॉर्म करतील, अशी समजूत झाल्यामुळे अब्दु एकाच ठिकाणी शांत बसून राहिला. तर, दुसरीकडे घरातील अनेक सदस्यांनी अब्दुचे तोंडदेखील कौतुक करत शेवटच्या क्षणी डाव पालटला. सगळे स्पर्धक एमसी स्टॅन संघात सामील झाले आणि त्याच्यासोबत एक रील तयार केली. अगदी सुरुवातीपासून अब्दुसोबत असलेले टीना दत्ता आणि साजिद खान यांनीही एमसी स्टॅनसोबत रील बनवली.

बिग बॉसने दाखवली स्पर्धकांची खरी रूपं

पहिला टास्क पूर्ण झाल्यानंतर एमसी स्टॅन आणि त्याचा संघ जिंकला. यानंतर त्यांना एक विशेषाधिकार मिळाला, परंतु, यादरम्यान, बिग बॉसने अब्दु रोजिकला घरातील सदस्यांची खरी रूपं दाखवली. तर, शिव या खेळात कमी पडल्याचे म्हणत त्याला अब्दुची माफी देखील मागण्यास सांगितले.

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' असणारा Abdu Rozik आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या संपत्ती...

Bigg Boss 16 Update: 'वयाच्या 14व्या वर्षी रस्त्यावर टूथपेस्ट विकत होतो'; बिग बॉसमध्ये साजिद खाननं सांगितली स्ट्रगल स्टोरी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
BMC Election : मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं? 
मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं, पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
BMC Election : मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं? 
मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं, पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
Embed widget