एक्स्प्लोर
Advertisement
BIG BOSS 11 : शिल्पा शिंदे विजेती, हीना खानवर मात
विजेत्याची घोषणा करण्यापूर्वी दहा मिनिटं व्होटिंग लाईन्स सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावेळी शिल्पा आणि हीनाच्या चाहत्यांमध्ये कांटे की टक्कर सुरु झाली.
मुंबई : 105 दिवस, 19 स्पर्धक आणि असंख्य टास्क्स.. यांना पार करत अभिनेत्री शिल्पा शिंदेने 'बिग बॉस 11'चं विजेतेपद पटकावलं आहे. प्रत्येक सिझनप्रमाणे बिग बॉसचं यंदाचं पर्वही अनेक वादांमुळे गाजलं होतं. हीना खान, विकास गुप्ता, पुनिश शर्मा यांना टक्कर देणाऱ्या शिल्पाच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली.
रविवारी रात्री 'बिग बॉस 11' च्या ग्रँड फिनालेमध्ये शिल्पाला ट्रॉफीसह 44 लाख रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं. अभिनेत्री हीना खान उपविजेती ठरली. विकास गुप्ताला तिसऱ्या तर पुनिश शर्माला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. होस्ट सलमान खानच्या सूत्रसंचालनामुळे ग्रँड फिनाले रंजक झाला.
विजेत्याची घोषणा करण्यापूर्वी दहा मिनिटं व्होटिंग लाईन्स सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावेळी शिल्पा आणि हीनाच्या चाहत्यांमध्ये कांटे की टक्कर सुरु झाली.
व्हायरल सत्य : शिल्पा शिंदे विकास गुप्तासोबत लग्न करणार?
'भाभीजी घर पे है?' मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे घराघरात पोहचली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच ती प्रेक्षकांची सर्वात लाडकी स्पर्धक ठरली होती. बिग बॉसच्या अकरा पर्वांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मराठी स्पर्धकाला जेतेपद मिळालं. अर्थात शिल्पा शिंदेचा मराठीद्वेष्टेपणा काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला होता.मराठी कलाकार उत्तम, पण त्यांना 'मी' पणा जास्त : शिल्पा शिंदे
“मराठीमध्ये बहुसंख्य कलाकार खूप उत्तम काम करतात. मात्र मराठी कलाकारांमध्ये अहंकार, मीपणा जास्त आहे. मै नही करुंगा...... असं त्यांचं वागणं असतं... मराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है”, असं शिल्पा शिंदे म्हणाली. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये आतापर्यंत एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांनी परफॉर्मन्स दिले. पुनिश शर्मा आणि त्याची गर्लफ्रेण्ड बंदगी कालरा, हितेन तेजवानी, अर्शी खान, आकाश दादलानी यांच्या डान्सनी मंचावर चार चांद लावले.अर्शी खान 'बिग बॉस'मधून मिळालेले पैसे अनाथ मुलांसाठी खर्च करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement