Hrithik Roshan : ह्रतिकनं शेअर केली सबासाठी खास पोस्ट ; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
ह्रतिक (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्या नात्याबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Hrithik Roshan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. ह्रतिक आणि गायिका सबा आझाद (Saba Azad) यांच्या जोडीबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार, सबा आणि ह्रतिक हे डेट करत आहेत. पण अजूनही ह्रतिकने सबासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. नुकतीच ह्रितकनं सबासाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
ह्रतिकनं इन्स्टाग्रामवर सबा आझाद आणि नसिरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सबा आणि इमाद यांच्या इलेक्ट्रो-फंक मॅडबॉय/मिंक या बँडबद्दल माहिती देण्यात आहे. या बँडचा शो पुण्यात होणार आहे. या पोस्टवर ह्रतिकनं, 'किल इट गाइज'असं लिहिले आहे. ह्रतिकच्या या पोस्टमुळे आता सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगबाबतच्या चर्चेला अधाण आलं आहे.
सुजैन खाननं शेअर केला होता सबाचा फोटो
ह्रतिकची पहिली पत्नी सुजैन खाननं सबाचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सबा ही गाणं गाताना दिसत आहे. सबाची रॉकेट बॉयज ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. तर ह्रतिकचे विक्रम वेधा आणि फायटर हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
ह्रतिकच्या फॅमिली फोटोमध्ये दिसली सबा
ह्रतिकचा फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सबा देखील दिसत होती. 20 फेब्रुवारी रोजी ह्रतिक रोशनच्या फॅमिलीसोबत संडे लंच करण्यसाठी सबा त्याच्या घरी गेली होती. राजेश रोशननं हा फॅमिली फोटो शेअर केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- राज्यातील ईडी कारवाईवर अभिनेता संदीप पाठक म्हणतो.....
- Mahesh Bhatt : महेश भट यांनी सांगितला आलियाच्या बालपणीचा किस्सा; म्हणाले...
-
Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
