Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकलेचं ट्वीट चर्चेत; म्हणाला, 'करण तुला 150 रूपये देतो, तू...'
ट्वीटमध्ये अभिजीत बिचुकलेनं (Abhijit Bichukale) अभिनेता करण कुंद्राला (karan Kundrra) एका कमाची ऑफर दिली आहे.
Abhijit Bichukale : मराठी बिग बॉस तसेच हिंदी बिग बॉसच्या 15 व्या (Bigg Boss 15) सिझनमुळे अभिजीत बिचुकलेला (Abhijit Bichukale) विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉस-15 या शोमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेनं अनेक वक्तव्य केली. अभिनेता सलमान खानबद्दल देखील त्यानं वक्तव्य केलं होतं. नुकतच अभिजीतनं एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं अभिनेता करण कुंद्राला (karan Kundrra) एका कमाची ऑफर दिली आहे.
अभिजीतनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'प्रतिक, शमिता, तेजस्वी आणि उमर हे सर्व चांगले कलाकार सध्या बिजी आहेत. करण कुंद्रा मी तुला 150 रूपये देतो तू पेढ्यांच्या जाहिरातीमध्ये काम करशीला का?'अभिजीतच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
Pratik Shamita Tejaswi Umar saare acche kalakaar toh busy hain sun @KKundrra tu mere pede ka ad karega kya? 150 rupya dunga
— Abhijit Bichukale (@AbhiBichukale) February 23, 2022
करण कुंद्रा लवकरच एका म्यूझिक व्हिडीओमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या म्यूझिक व्हिडीओमध्ये गायिका अकासा देखील असणार आहे. या व्हिडीओचे शूटिंग सध्या गोव्यामध्ये सुरू आहे. शूटिंग दरम्यानचे फोटो करणनं सोशल मीडियावर शेअर केले होते. 'कितनी मोहब्बत है' ‘जरा नचके देखा’, ‘बेताब दिल की तमन्ना’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये करणनं प्रमुख भूमिका साकारली. त्याने काही रिअॅलिटी शो देखील होस्ट केले आहेत. करणने ‘रोडीज’ या शोचे परिक्षण केले आहे. तसेच त्याने अनुषा दांडेकरसोबत ‘लव्ह स्कूल’ हा शो होस्ट केला.
महत्वाच्या बातम्या :
- राज्यातील ईडी कारवाईवर अभिनेता संदीप पाठक म्हणतो.....
- Mahesh Bhatt : महेश भट यांनी सांगितला आलियाच्या बालपणीचा किस्सा; म्हणाले...
-
Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha