Tejasswi Prakash , Karan Kundrra : 'बिग बॉस'च्या घरात जुळलं सूत, तेजस्वीने सांगितला करणसोबतच्या पहिल्या 'व्हॅलेंटाईन डे'चा प्लॅन
Tejasswi Prakash , Karan Kundrra : तेजस्वीनं त्याचा करणसोबतच्या व्हॅलेटाईन डे च्या सेलिब्रेशनबद्दल सांगितलं आहे.
Tejasswi Prakash , Karan Kundrra : बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss 15) या कार्यक्रमाची तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही विजेती ठरली. बिग बॉसच्या या सिझनमध्ये करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांची केमिस्ट्री बिग बॉस 15 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बिग बॉसचा सिझन संपला तरी या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. एका मुलाखतीमध्ये तेजस्वीनं त्याचा करणसोबतच्या व्हॅलेटाईन डे च्या सेलिब्रेशनबद्दल सांगितलं आहे.
मुलाखतीमध्ये तेजस्वीनं सांगितलं, 'मी अजून काही प्लॅन केला नाही. माझ्याकडे श्वास घेण्यासाठी देखील वेळ नाहीये मी खूप व्यस्त आहे. मी शूटिंगमध्ये व्यस्त असू शकते त्यामुळे शूटिंग झाल्यानंतर मी आणि करण डिनरला जावू. मी अजून फिक्स असा कोणताही प्लॅन केलेला नाही.'
तेजस्वीनं पुढे सांगितलं की, 'व्हॅलेंटाईन डे' मुळे करण प्रेशरमध्ये आहे. कारण काही चाहत्यांची अशी इच्छा आहे की त्यानं या दिवशी काही तरी स्पेशल करावं.
View this post on Instagram
एका मुलाखतीमध्ये तेजस्वीच्या भावानं सांगितले होते, 'तेजस्वी आणि करणच्या नात्याला आमच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.' तर तेजस्वीच्या वडिलांनी म्हणाले की, 'सर्व काही ठिक झाले तर लवकरच करण आणिल तेजस्वीचा विवाह सोहळा पार पडेल. '
हेही वाचा :
- Gangubai Kathiawadi : रणवीर सिंगकडून आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं जोरदार प्रमोशन, ‘ढोलिडा’वर धरला ठेका!
- Prajaktta Mali : ‘लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे!’, प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
- Kangana Ranaut : ‘असा कचरा विकू नका’, कंगना रनौतची दीपिकाच्या ‘Gehraiyaan’वर सडकून टीका!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha