एक्स्प्लोर

Prajaktta Mali : ‘लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे!’, प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

‘पावनखिंड’ हा मराठी चित्रपट 18 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो सध्या चर्चेत आला आहे.

Prajaktta Mali : कोरोना विषाणूचा जोर आता काहीसा ओसरलेला दिसतोय. बऱ्याच ठप्प झालेल्या गोष्टी आता पूर्ववत होताना दिसत आहेत. अशातच आता अनेक चित्रपट देखील चित्रपटातगृहात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. ‘पावनखिंड’ हा मराठी चित्रपट देखील 18 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो सध्या चर्चेत आला आहे.

प्राजक्ता माळी हिने (Prajaktta Mali) या व्हिडीओत महाराष्ट्र सरकारकडे एक मागणी केली आहे. या व्हिडीओत अभिनेत्री म्हणते की, आता कोरोनाचा जोर बराच ओसरला आहे. बरेचसे निर्बंध देखील शिथिल झाले आहेत. मात्र, चित्रपटगृह आणि नाट्यगृह अजूनही 50% क्षमतेनेच सुरु आहेत. आता बरेच अडकलेले प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत. तर आता ही मर्यादा हटवून पुन्हा पूर्ण क्षमतेने थिएटर सुरु करावे, अशी सरकारला विनंती.’

पाहा व्हिडीओ :

‘पावनखिंड’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. तर अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 18 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. चित्रपटात छत्रपतींची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर साकारणार आहे.

‘पावनखिंड’ या चित्रपटात मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar), प्राजक्ता माळी (Prajakta Mali) , अंकित मोहन (Ankit Mohan), क्षिती जोग (kshitee jog), अजय पूरकर (Ajay Purkar), समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) आणि शिवराज वायचळ (Shivraj Waichal) या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

72nd National Film Awards : 'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
Paresh Rawal On Amitabh Bachchan: 'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget