Swapnil Joshi Shared Photos With Tesla Cybertruck: स्वप्नील जोशीनं विकत घेतली महागडी Tesla Cybertruck कार? अलिशान कारची किंमत ऐकून चाट पडाल
Swapnil Joshi Shared Photos With Tesla Cybertruck: स्वप्नील जोशीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वप्नीलसोबतच एक गाडी दिसतेय. ती गाडी Tesla Cybertruck आहे.

Swapnil Joshi Shared Photos With Tesla Cybertruck: मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत असतो. लाखो तरुणींच्या दिलाची धडकन असलेला स्वप्नील सोशल मीडियावरुन त्याच्या लाईफमधले अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. स्वप्नीलनं एखादी पोस्ट टाकली की, काही वेळातच ती व्हायरल झालीच म्हणून समजा. असंच स्वप्नीलनं काही दिवसांपूर्वी एका गाडीसोबतचा फोटो शेअर केला होता. स्वप्नीलचे फोटो पाहून चाहत्यांचे डोळे विस्फारलेच, पण त्या फोटोत स्वप्नीलपेक्षाही त्याच्या मागे असलेली गाडी पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
स्वप्नील जोशीनं विकत घेतलीय टेस्ला कार?
स्वप्नील जोशीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वप्नीलसोबतच एक गाडी दिसतेय. ती गाडी Tesla Cybertruck आहे. स्वप्नीलनं टेस्का कारसोबतचा फोटो शेअर करुन चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. स्वप्नीलनं टेस्लाकारसोबतचे फोटो पोस्ट करत "ही तुझ्यासाठी आहे राघव! टेस्ला सायबरट्रक" असं कॅप्शन दिलंय. स्वप्नीलनं शेअर केलेला फोटो आणि त्यासोबत शेअर केलेला फोटो, हे सारं काही चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारं होतं. मग काय, या पोस्टवर चाहत्यांनी अक्षरशः उड्या घेतल्या. काहींनी स्वप्नीलचं नवी गाडी घेतल्याबद्दल अभिनंद केलं, तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या.
View this post on Instagram
स्वप्नीलच्या पोस्टवर कमेंट करत एका युजरनं विचारलंय की, "घेतली काय? भावा एक चक्कर देना", तर दुसऱ्या एका युजरनं विचारलंय की, "ही कार तुझी आहे का?" तर अनेकांनी स्वप्नीलला शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, स्वप्नीलच्या फोटोमध्ये दिसत असलेली कार स्वप्नीलची नाही, तर ही कार गुजरातमधल्या एका उद्योजकाची आहे, अशी माहिती समोर आली आहे. स्वप्नील जोशी एखाद्या कामानिमित्त त्या उद्योजकाला भेटला असावा आणि त्याचवेळी त्यानं हा फोटो घेतला असावा असं बोललं जात आहे. दरम्यान, टेस्ला कार घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. अशातच स्वप्नील जोशीला गाड्यांचा शौकीन आहे, हे आपण सारेच जाणतो. तसेच, जगभरातील नामांकीत कार्समध्ये समाविष्ट होणारी टेस्ला कार भारतात उपलब्ध नाही. जर कुणाला ती कार हवी असेल तर, ही कार आयात करावी लागते. भारतात काही लोकांनीच ही कार आयात केली आहे. त्यापैकी गुजरातचा उद्योजक एक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























