Suraj Chavan Get Shahir Dada Kondke Award: लय भारी वाटतंय... 'झापुक झुपूक' स्टार सूरज चव्हाणचा स्वर्गीय शाहीर दादा कोंडके पुरस्कारानं सन्मान
Suraj Chavan Get Shahir Dada Kondke Award: सूरजची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झाल्यानंतर सुरुवातीला त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर सूरजचा घरात राहताना अनेक अडचणी येत होत्या.

Suraj Chavan Get Shahir Dada Kondke Award: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाची ट्रॉफी सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) जिंकली आणि त्याच मंचावर त्याला दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Kedar Shinde) सिनेमाची ऑफर दिली. सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा (Zapuk Zhupuk Movie) रिलीज झाला आणि महाराष्ट्रानं त्यावर भरभरुन प्रेम केलं. खेडेगावात राहणारा अत्यंत साधाभोळा मुलगा फक्त आणि फक्त टिकटॉकच्या व्हिडीओंमुळे लोकप्रिय झाला. टिकटॉकमधून त्यानं बक्कळ पैसे कमावले, पण त्याच्या साधेभोळेपणाचा फायदा घेऊन अनेकांनी त्याला फसवलं. त्यानंतर देशात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली, त्यामुळे सूरजची क्रेझही कमी झाली. त्यानंतर अचानक बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या घरात सूरजची एन्ट्री झाली आणि त्याच्या साध्याभोळ्या पणावर अख्खा महाराष्ट्र फिदा झाला. महाराष्ट्रानं दिलेल्या प्रेमाच्या जोरावर सूरज जेतेपदापर्यंत अगदी सहज पोहोचला.
सूरजची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झाल्यानंतर सुरुवातीला त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर सूरजचा घरात राहताना अनेक अडचणी येत होत्या. त्याला बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या. पण, घरातील स्पर्धकांनी सूरजला सांभाळून घेतलं. त्याला टास्ट समजावून सांगितले, त्याजोरावर सूरज शोमध्ये पुढे पुढे जाऊ लागला आणि थेट शोच्या फिनालेपर्यंत गेला अन् ट्रॉफी मिळवली.
View this post on Instagram
सूरज चव्हाणचा स्वर्गीय शाहीर दादा कोंडके पुरस्कारानं सन्मान
आता सूरजच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण आला आहे. सूरज चव्हाणला स्वर्गीय शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. नुकताच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. स्वतः सूरजनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "तुमच्या अख्यांच्या प्रेमामुळे मला दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार मिळाला , लय भारी वाटतंय असंच प्रेम राहू द्या" या कार्यक्रमाला सूरजची सहस्पर्धक जान्हवी किल्लेकर उपस्थित होती. सूरज चव्हाणला मिळालेल्या या पुरस्कारामुळे सोशल मीडियावर त्याचं भरपूर कौतुक होत आहे. त्याच्या चाहत्यांचा उर अभिमानानं भरुन आला असून चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
दरम्यान, सूरजचा काही दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये सूरज मुलगी बघायला जातो आणि तिथेच तिच्या प्रेमात पडून साखरपुडा उरकून घेतो, असं दिसतंय. त्यानंतर चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण, त्या व्हिडीओच्या शेवटी सूरज स्वप्न पाहत असल्याचं चाहत्यांना समजतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























