Sushmita Sen Arya 2 first look : 'शेरनी इज बॅक'; सुष्मिता सेनने शेअर केला 'आर्या-2' चा फर्स्ट लूक
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकत असते. सुष्मिता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
Web Series Arya 2 first look Release : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकत असते. सुष्मिता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या नव्या चित्रपटांबद्दल आणि वेब सीरिजबद्दल ती सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती देते. सुष्मिताच्या 'आर्या' या वेब सीरिजमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. नुकताच सुष्मिताने तिच्या 'आर्या-2' या नव्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. 20 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करून सुष्मिताने तिच्या चाहत्यांना आर्या-2 मधील तिच्या लूकची झलक दिली आहे.
आर्या-2 फर्स्ट लूक
सुष्मिताने शेअर केलेल्या आर्या-2 च्या फर्स्ट लूकमध्ये ती लाल रंगामध्ये रंगलेली दिसत आहे. हा लूक शेअर करून सुष्मिताने कॅप्शन दिले, 'शेरनी इज बॅक'. सुष्मिताच्या हा लूक पाहून चाहत्यांना या वेब सीरिजबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सुष्मिताच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी तिच्या 'आर्या-2' मधील या लूकला पसंती दिली आहे.
View this post on Instagram
Annaatthe Movie Box Office: रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सात दिवसांत केली एवढी कमाई
पहिल्या सीझनला मिळाली होती प्रेक्षकांची पसंती
आर्या या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीझनमध्ये सुष्मितासोबतच चंद्रचूर सिंह, नमित दास, अंकुर भाटिया आणि विकास कुमार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सीरिजच्या पहिल्या सीझनचे दिग्दर्शन हे राम माधवानी, संदीप मोदी आणि विनोद रावत यांनी केले होते. सीरिजच्या पहिल्या सीझनमधील सुष्मिताच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आता आर्याचा दुसरा सीझन हॉटस्टार अॅपवर प्रदर्शित होणार आहे. या नव्या सीझनची रिलीज डेट अजून जाहिर झाली नसून प्रेक्षक आर्या-2 ची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.