एक्स्प्लोर

'पांडू' सिनेमातील 'जाणता राजा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, प्रविण तरडे साकारणार राजकीय नेत्याची भूमिका

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला 'पांडू' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'जाणता राजा' हे गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आले आहे.

Pandu Movie New Song: पांडू (Pandu) सिनेमातील 'जाणता राजा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याद्वारे प्रविण तरडेंचा (Pravin Tarade) नवा लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. याआधी पांडू सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरलादेखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. टिझरमधून भाऊ कदम (bhau kadam) आणि कुशल बद्रिकेची (Kushal Badrike) जोडी दिसून आली होती. आता 'पांडू' सिनेमातील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे नाव 'जाणता राजा' असे आहे. या गाण्यात प्रविण तरडेंचा हटके लूक दिसून येत आहे. 

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडेंनी आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून प्रविण तरडेंचा करारी बाणा प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे. एक शिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र ते या सिनेमात साकारत आहेत. नुकतचं प्रदर्शित झालेलं 'जाणता राजा' हे गाणं शिवाजी महाराजांची महती सांगणारं आहे. या गाण्याच्या माध्यमातून प्रविण तरडेंचा लूक समोर आला आहे.  

जाणता राजा या गाण्याचे गीतकार समीर सामंत आहेत. तर हे गाणे अवधूत गुप्तेंनी संगीतबद्ध केले आहे. धारधार आवाजाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आदर्श शिंदेंनी हे गाणे जोशात गायले आहे. या सिनेमातील भूमिकेविषयी प्रविण तरडे म्हणाले,"या भूमिकेबद्दल मी कमालीचा उत्सुक आहे. हा लूक प्रेक्षकांसमोर कधी येतो याची मी स्वतः गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होतो. हे गाणं, हा लूक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे".  

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'पांडू' सिनेमाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. तर चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे. मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असलेला 'पांडू' हा येत्या ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. लॉकडाऊनचा ताण अनलॉक करण्यासाठी प्रेक्षकांनी 'पांडू' सिनेमा बघायला हवा. पांडू सिनेमात भाऊ  कदम, कुशल बद्रिके, प्रविण तरडेंसह प्राजक्ता माळीदेखील एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात प्राजक्ता कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

संबंधित बातम्या

Antim New Song: 'अंतिम' सिनेमातील गाणे प्रदर्शित, वलूचा डिसूजाची ठसकेबाज लावणी

Annaatthe Movie Box Office: रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सात दिवसांत केली एवढी कमाई

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

   

महत्त्वाच्या बातम्या

Neena Gupta Pregnant At 67 Age: नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
Paresh Rawal On Gujarat Hosting 72nd National Film Awards: 'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
Sharat Saxena 6 Hour Spine Surgery: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Embed widget