Sudipto Sen Reacts On National Award: 'ते घडलं नाही, त्यामुळे मला थोडं वाईट वाटलं...'; राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही 'द केरला स्टोरी'च्या दिग्दर्शकांची खंत
Sudipto Sen On National Award: दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांची राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आली. माझी अभिनेत्री अदा शर्माला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Sudipto Sen Reacts On Getting National Award For The Kerala Story: नुकत्याच जाहीर झालेल्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'द केरळ स्टोरी'ला (The Kerala Story) दोन पुरस्कार मिळाले. 2023 या वर्षात प्रदर्शित झालेल्या कलाकृतींनी प्रदान करण्यात येणाऱ्या या पुरस्कारांमध्ये 'द केरला स्टोरी' या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार (National Award) जाहीर झाले. अशातच, सिनेमाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन (Sudipto Sen) यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी आनंद व्यक्त केला आहे. पण, त्यासोबतच त्यांनी एक खंतही व्यक्त केली आहे. अदा शर्माला (Adah Sharma) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळायला हवा होता, पण असं झालं नाही... त्यामुळे मला थोडे वाईट वाटलं..., असं सुदिप्तो सेन म्हणाले.
आता चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायांकन पुरस्कारांसह दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक अजूनही यावर खूश दिसत नाहीत. त्यांनी म्हटलं की, चित्रपटाला अधिक पुरस्कार मिळायला हवे होते.
राष्ट्रीय पुरस्कार मिळणं सुखद आश्चर्य : दिग्दर्शक सुदिप्तो सेन
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुदिप्तो सेन म्हणाले की, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळणं सुखद आश्चर्य होतं, पण लेखन आणि मेकअपसारख्या तांत्रिक विभागांनाही मान्यता मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती.
याबाबत बोलताना सुदिप्तो सेन म्हणाले की, "मला आश्चर्य वाटलं. मला तांत्रिक पुरस्कारांची अपेक्षा होती. माझ्या तंत्रज्ञांच्या कामाला ओळख मिळावी अशी माझी इच्छा होती. जेव्हा एखादा चित्रपट इतका मोठा होतो की, तो रिलीज झाल्यानंतर दोन वर्षांनीही त्यावर चर्चा होते, तेव्हा तो तांत्रिकदृष्ट्या नक्कीच चांगला असतो. त्यामुळेच माझ्या तंत्रज्ञांना पुरस्कार मिळेल, अशी माझी अपेक्षा होती. माझ्या डीओपीला पुरस्कार मिळाला, पण माझा लेखक, माझा मेकअप आर्टिस्ट आणि माझी अभिनेत्री अदा शर्मा यांनाही तो मिळाला असता तर मला आनंद झाला असता... पण ते घडलं नाही आणि त्यामुळे मला थोडे वाईट वाटलं..."
माझ्या प्रेक्षकांची मान्यता माझ्यासाठी महत्त्वाची : सुदिप्तो सेन
"मी जवळपास 20-25 वर्षांपासून मुंबईत राहतोय, पण मला कधीच बॉलीवूडमध्ये घरच्यासारखे वाटलं नाही. मुंबईतील फिल्म इंडस्ट्री ज्या प्रकारचा सिनेमा बनवते, त्या प्रकारामध्ये मी मोडत नाही, मी त्याकरता आऊटसायडर आहे. लोक मला इथे क्वचितच ओळखतात. त्यांच्या मान्यतेला माझ्या सिनेमॅटिक प्रवासात कधीच महत्त्व नव्हते. माझ्या प्रेक्षकांची मान्यता माझ्यासाठी महत्त्वाची आहे...", असं सुदिप्तो सेन म्हणाले.
दरम्यान, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली. या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये मुलींच्या एका गटाचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. निषेध असूनही, चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप दाद मिळाली. अनेकांनी या सिनेमाचा उल्लेख 'Propaganda' असाही केलेला आणि सिनेमाला बंदीचाही सामना करावा लागलेला. बॉक्स ऑफिसवर चित्रपट सुपरहिट ठरला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























