एक्स्प्लोर

सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट फ्लॉप; केदार शिंदे म्हणाले, "माझ्याच विचारातच खोट... प्रेक्षकांना सूरज अभिनेता म्हणून नकोच असेल"

Kedar Shinde Reaction On Suraj Chavan Zapuk Zupuk Movie: सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सिनेमा हाऊसफुल्ल चालेल, असं वाटलेलं पण सिनेमा पाहायला थिएटरकडे प्रेक्षक वळलेसुद्धा नाहीत. आता यावर खुद्द दिग्दर्शक केदार शिंदेनी भाष्य केलं आहे. 

Kedar Shinde Reaction On Suraj Chavan Zapuk Zupuk Movie: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता, रिलस्टार सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) काही दिवसांपूर्वी 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk Marathi Movie) हा मराठी सिनेमा (Marathi Movie) प्रदर्शित झालेला. सूरज बिग बॉस मराठीच्या घरात असताना प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावरु उचलून घेतलं होतं. सूरजची फॅनफॉलोविंग इतर स्पर्धकांवर प्रचंड भारी पडलेली. त्यामुळेच सूरजचा सिनेमा सुपरडुपर हिट ठरणार, असंच समजलं जात होतं. पण, प्रत्यक्षात सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मात्र, असं काही घडलंच नाही. 

सूरज चव्हाणनं बिग बॉसची ट्रॉफी उंचावल्यानंतर त्याच मंचावरुन दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) यांनी त्याच्यासोबत सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली. तेव्हापासूनच या सिनेमाची चर्चा रंगलेली. त्यामुळे हा सिनेमा हिट ठरणार, बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) बक्कळ कमाई करणार असल्याचं जवळपासून निश्चित असल्याचंच मानलं जात होतं. दणक्यात प्रमोशनही झालेलं... पण, प्रत्यक्षात मात्र, असं काहीच घडलं नाही. सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सिनेमा हाऊसफुल्ल चालेल, असं वाटलेलं पण सिनेमा पाहायला थिएटरकडे प्रेक्षक वळलेसुद्धा नाहीत. आता यावर खुद्द दिग्दर्शक केदार शिंदेनी भाष्य केलं आहे. 

सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाबाबत काय म्हणाले केदार शिंदे? 

'मुक्कामपोस्ट मनोरंजनला'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केदार शिंदे म्हणाले की, "मला वाटतंय कदाचित माझ्या विचारांतच काहीतरी खोट असेल, सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही... त्यांना सूरज चव्हाणला अभिनेता म्हणून बघायचाच नसेल... त्यांनी ती गोष्ट नाकारली..."

"मूल जन्माला घातल्यानंतर दहा दिवसांनी समजतं की, त्याचा मृत्यू झालाय... तेव्हा जे दु:ख होतं, तेच दु:ख आपल्या एखाद्या कलाकृतीचं अपयश एका दिग्दर्शकाला पाहून होतं... ते दहा दिवस अत्यंत त्रासदायक असतात... जर ते नसेल तर मग आपण सृजनशील कलावतं नाहीत आहोत, आपल्याला त्याचं दु:ख व्हायलाच पाहिजे... पण, मी असा विचार नाही करू शकत की, प्रेक्षकांना अक्कल नाही... उलट ज्यांनी मला नाकारलं, त्यांच्याकडेच कदाचित जास्त अक्कल आहे... आता त्यांच्या मनात मी माझं स्थान कसं निर्माण करणार, याचेच माझ्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या चुका आधी केल्यात त्या पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेतो... कारण, यशाचा कोणताच फॉर्म्युला नाही..."

दरम्यान, मराठीतील दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमामध्ये सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे अशी तगड्या कलाकारांची स्टारकास्ट होती. या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकारानं प्रचंड मेहनत घेतली होती. तसेच, या सिनेमाचं दणक्यात प्रमोशनही करण्यात आलेलं. पण, प्रत्यक्षात सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :  

Milind Gawali On Suraj Chavan Zapuk Zupuk Movie: सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' का चालला नाही? सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget