Subodh Bhave : सुबोध भावेची फेसबुक पोस्ट चर्चेत; म्हणाला, 'तुम्हाला वाटलं असेल की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण...'
कार्यक्रमातील संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ शेअर करुन सुबोधनं (Subodh Bhave) त्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Subodh Bhave : पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात बोलत असताना केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा सध्या चर्चेत आहे. आपण शिक्षण घेतो, नोकरी शोधतो, उत्तम काम करतो मात्र लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश दिला आहे, अशी टीका यावेळी सुबोधनं केली होती. पण आता या कार्यक्रमातील संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ शेअर करुन सुबोधनं त्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
सबोध भावेची पोस्ट
सुबोधनं त्याच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,'नमस्कार, काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे.त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ. आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा "संपूर्ण भाषण" त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा. आपला, सुबोध भावे, जय हिंद! जय महाराष्ट्र!' त्याच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं,'कलाकारांनी व्यक्त व्हायलाच पाहिजे' असं म्हणत सुबोधचं कौतुक केलं. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'छान बोललात.'
पाहा व्हिडीओ:
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून 'शतसूर्याचे तेज' या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुबोध भावे हा प्रमुख पाहूणा म्हणून उपस्थित होता. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
सुबोधचा बस बाई बस हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर यांनी हजेरी लावली. आता या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये कोण हजेरी लावणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
हेही वाचा:
Subodh Bhave In Pune: ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाती देश सोपावला आहे; सुबोध भावेची टीका