![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Stree 2 OTT Release: सिनेमागृहानंतर आता 'तो' तुमच्या घरी येणार, कधी आणि कुठे पाहाल 'स्त्री-2'?
Stree 2 OTT Release: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता स्त्री-2 ओटीटीवर रिलीज होणार आहे. सिनेमा कधी आणि कुठे पाहता येणार त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
![Stree 2 OTT Release: सिनेमागृहानंतर आता 'तो' तुमच्या घरी येणार, कधी आणि कुठे पाहाल 'स्त्री-2'? Stree 2 OTT Release Date Time Shraddha Kapoor Rajkummar Rao Horror Comedy Streaming Stree 2 OTT Release: सिनेमागृहानंतर आता 'तो' तुमच्या घरी येणार, कधी आणि कुठे पाहाल 'स्त्री-2'?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/18/d3fac6ff2c9681addd85aa27954f0f9d1726660525968720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Stree 2 OTT Release: 'स्त्री'च्या यशानंतर प्रेक्षकांना 'स्त्री-2'ची (Stree 2) उत्सुकता लागून राहिली होती. हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. आजही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असल्याचं चित्र आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच आठवडे झाले असले तरीही अजून हा सिनेमा कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. पण आता हा थरार चित्रपटगृहांमध्ये पाहिल्यानंतर आता ही जादू ओटीटीवरही पाहायला मिळणार आहे.
नुकतीच स्त्री-2 च्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 'स्त्री 2' मध्ये श्रद्धा कपूरसोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे तमन्ना भाटिया, अक्षय कुमार आणि वरुण धवन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका भूमिका आहेत.
'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा होणार रिलीज
रिपोर्ट्सनुसार, स्त्री-2 हा येत्या 27 सप्टेंबर रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. पण यासाठी प्राईम व्हिडीओकडून एक ट्विस्ट देण्यात आला आहे. कारण हा सिनेमा पहिल्यांदा तुम्हाला रेंटवर पाहायला लागणार आहे. म्हणजे सुरुवातीला काही पैसे हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील. 27 सप्टेंबरनंतर काही दिवसांनी तुमच्या सब्सक्रिप्शनवर तुम्ही हा सिनेमा मोफत पाहू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल.
बॉक्स ऑफिसवर सिनेमाची बंपर कमाई
स्त्री-2 ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई होतेय. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 585 कोटींची कमाई केली आहे. काही दिवसांत हा चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. त्यातच आता ओटीटीवरही हा सिनेमा येत्या काही दिवसांतच पाहता येणार आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)