एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sridevi Birthday : अकाली निधनाने 'सदमा' देऊन गेल्या श्रीदेवी, 'रुपाच्या राणी'ची बहारदार कारकीर्द
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अशी ओळख असलेल्या श्रीदेवी (Sridevi) यांचा आज वाढदिवस. त्यांच्या अनेक भूमिकांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.त्यांच्या अचानक मृत्यूने त्या आपल्या परिवारासह चाहत्यांना 'सदमा' देऊन गेल्या. जाणून घेऊ त्यांच्या कारकीर्दीविषयी...
मुंबई : बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांचा आज वाढदिवस. गंभीर असो वा विनोदी, त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणूनही त्यांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. 24 फेब्रुवारी रोजी 2018 वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी दुबईत कार्डिअॅक अरेस्टने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्रीदेवी यांची कारकीर्द
श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला होता. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे.
1967 - वयाच्या चौथ्या वर्षी थुनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात
1971 - वयाच्या आठव्या वर्षी पुम्बाता या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार
1975 - वयाच्या 12 व्या वर्षी ज्युली या बॉलिवूडपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण.
1976 - वयाच्या 13 व्या वर्षी मूंद्रू मुदिचू हा तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला चित्रपट मानला जातो.
1978 - वयाच्या 15 व्या वर्षी 'सोलवा सावन हा पहिला बॉलिवूडपट
श्रीदेवी यांच्या नावाचा खरा गवगवा झाला तो 1983 साली प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला चित्रपटानं. जीतेंद्र आणि श्रीदेवी या जोडीनं मग मवाली, मकसद, जस्टिस चौधरी असे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले.
कमल हासनसोबतच्या सदमा या चित्रपटातल्या श्रीदेवी यांच्या अभिनयाला समीक्षकांकडून कौतुकाची पावती मिळाली. मग चांदनी, लम्हे, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, नगिना, चालबाज यासारख्या चित्रपटांमधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत त्यांचं एक वेगळं वलय निर्माण झालं. मिस्टर इंडिया या चित्रपटातल्या एका नृत्यानं त्यांना मिस हवाहवाई हे टोपणनाव मिळवून दिलं होतं.
गाजलेले चित्रपट
1983- सदमा
1983- हिम्मतवाला
1983- जस्टिस चौधरी
1983- मवाली
1983- कलाकार
1984- तोहफा
1986- नगिना
1986- आग और शोला
1986- कर्मा
1986- सुहागन
1987 - औलाद
1987 - मिस्टर इंडिया
1989 - निगाहे (नगिना भाग 2)
1989 - चांदनी
1989 - चालबाज (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1991 - फरिश्ते
1991 - लम्हे (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1992 - खुदा गवाह
1992 - हीर रांझा
1993 - रुप की रानी चोरों का राजा
1993 - गुमराह
1993 - चंद्रमुखी
1994 - लाडला
1997 - जुदाई
जुदाई चित्रपटानंतर 15 वर्षांचा ब्रेक
2004 - सहारा वन चॅनलवर मालिनी अय्यर या दैनंदिन मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री
2008 - फॅशन मॉडेल म्हणून पदार्पण. लॅक्मे फॅशन वीक मधून रॅम्पवर पाऊल
2012 - गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवींनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं.
2017 - 'मॉम' हा अखेरचा चित्रपट
'मॉम' हा त्यांचा तीनशेवा चित्रपट अखेरचा ठरला. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटाचं शूटिंग त्या करत होत्या.
श्रीदेवी यांची गाजलेली 15 गाणी
ऐ जिंदगी, गले लगा ले (सदमा)
गोरी तेरे अंग अंग मे (तोहफा)
मै तेरी दुश्मन (नगिना)
हवाहवाई (मि. इंडिया)
काटे नही कटते (मि. इंडिया)
ना जाने कहा से आई है (चालबाज)
नैनो मे सपना (हिम्मतवाला)
मेरे हाथों मे (चांदनी)
रंग भरे बादल से... चांदनी (चांदनी)
मोरनी बागा मां (लम्हे)
मेरी बिंदिया (लम्हे)
मै रुप की रानी तू चोरों का राजा (रुप की रानी चोरों का राजा)
तू ना जा मेरे बादशाह (खुदा गवाह)
प्यार प्यार करते करते (जुदाई)
नवराई माझी (इंग्लिश विंग्लिश)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement