एक्स्प्लोर

Jayam Ravi Divorce : प्रसिद्ध तमिळ अभिनेता जयम रवीकडून पत्नीसोबत घटस्फोटाची घोषणा, एक्ट्रा-मॅरिटल अफेअरची चर्चा; सत्य काय?

Jayam Ravi and Aarti Divorce : अभिनेता जयम रवीच्या घटस्फोटाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर त्याच्या एक्ट्रा-मॅरिटल अफेअरची चर्चा रंगली आहे.

Actor Jayam Ravi Divorce : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता जयम रवी याने पत्नीसोबत घटस्फोटाची घोषणा केली आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जयम रवीने ट्विटरवर निवेदन पोस्ट करत पत्नी आरतीपासून विभक्त होत असल्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, या कपलच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येताच सोशल मीडियावर त्याच्या एक्ट्रा-मॅरिटल अफेअरची चर्चा रंगली आहे. जयम रवी यांच्या घटस्फोटाचा निर्णय एकतर्फी असल्याचं पत्नी आरतीने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं. 

अभिनेता जयम रवीकडून पत्नीसोबत घटस्फोटाची घोषणा

तामिळ अभिनेता जयम रवीने पत्नी आरतीपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केल्यामुळे तो चर्चेत आहे. जयम रवी एक्स मीडिया अकाऊंटवर पत्नीपासून वेगळं होत असल्याचं जाहीर केलं. यानंतर त्याने इंस्टाग्रामवरील पत्नीसोबतचे पोस्ट, फोटो आणि व्हिडीओही हटवले. दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जयम रवीच्या एक्स्ट्रा मॅरियल अफेअरची चर्चाही सुरु आहे. याबद्दल सत्य जाणून घ्या.

घटस्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट नाही

जयम रवी सांगितलं की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वीच त्यांच्यात कायदेशीर कार्यवाही सुरू होती, असं रवीने सांगितलं. जयम रवी म्हणाला की, त्याने पत्नी आरतीला दोन कायदेशीर नोटीस पाठवल्या, पण तिने नोटीसांना प्रतिसाद दिला नाही. आरतीच्या वागण्यावरून तिला पॅचअप करायचं आहे का? असा प्रश्न जयमने उपस्थित केला. जयम रवी पुढे म्हणाला की, मला घटस्फोटाची जाहीर घोषणा करण्यास भाग पाडलं गेलं, कारण त्याच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या आणि त्याच्या चाहत्यांसाठी त्याची जबाबदारी आहे की त्याने यावर भाष्य करावं.

एक्ट्रा-मॅरिटल अफेअरची चर्चा; सत्य काय?

जयम रवी आणि आरती यांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. दोघांनी घटस्फोट घेण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, जयम रवीचे गायिका केनिशा फ्रान्सिससोबत अफेअर असल्याचीही चर्चा सुरु आहे. यावर अभिनेता जयम रवीने मौन सोडलं आहे. रवी म्हणाला की, सायकॉलॉजिस्ट असल्याने तो गायिका केनिशाला भेटत होतो, कशातही, कोणाचंही नाव ओढणं योग्य नाही.

मुलांची कस्टडी मिळण्यासाठी प्रयत्न

जयम रवी पुढे म्हणाला की, आता सध्या तो जिथे उभा आहे, तिथून परत येण्याचा मार्ग नाही. घटस्फोटाची पहिली सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचेही रवीने सांगितले. आता तो मुंबईला शिफ्ट झाला आहे. आता जयम रवी आरव आणि अयान या दोन्ही मुलांचा ताबा मिळवण्यासाठी लढणार आहे. यासाठी आपण कायद्याची मदत घेत असल्याचे त्याने सांगितले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : "निक्की घराबाहेर आल्यावर मी तिला सगळं सांगेन", साखरपुडा झाल्याच्या चर्चांवर अरबाजची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget