एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : "निक्की घराबाहेर आल्यावर मी तिला सगळं सांगेन", साखरपुडा झाल्याच्या चर्चांवर अरबाजची प्रतिक्रिया

Arbaaz Patel Engagement Rumors : बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईने मोठा खुलासा करताना तिला सांगितलं की, अरबाजचा आधीच साखरपुडा झालाय. यानंतर निक्कीचा मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं.

Bigg Boss Marathi Latest Episode : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. लवकरच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता मिळणार आहे. बिग बॉस मराठीमध्ये कुटुंबियांची भेट घडवण्यात आली आहे.  बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांची घरची मंडळी त्यांना भेटायला आली होती. यावेळी सर्व सदस्य खूप इमोशनल झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी निक्कीची आई आणि बाबाही घरात आले होते. त्यांनी निक्कीला रागावर कंट्रोल ठेवायला सांगितला. यासोबतच निक्कीच्या आईने अरबाजबाबत धक्कादायक खुलासाही केला.

निक्कीच्या आईचा बिग बॉसच्या घरात मोठा खुलासा

बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईने मोठा खुलासा करताना तिला सांगितलं की, अरबाजचा आधीच साखरपुडा झालाय. त्याच्या रिलेशनशिपची खूप चर्चा आहे, वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्याच्या आईने म्हटलंय की, दोन शोनंतर आधीच त्याच्या मागे दोन मुली पडल्या आहेत. आता ही तिसरी आहे. मी सगळ्यांना घरात नाही घेऊ शकत. निक्कीच्या आईने अरबाजबद्दल असं सांगताच निक्कीला मोठा धक्का बसला. यानंतर निक्कीने तिच्याजवळ असलेले अरबाजच्या वस्तू आणि कपडे स्टोअर रुममध्ये ठेवले. निक्की पुढे म्हणाली की, अरबाज आणि निक्की हा विषय आता संपलाय.

साखरपुड्याच्या चर्चांवर अरबाजची प्रतिक्रिया

बिग बॉसच्या घरातील हा प्रकार पाहता अरबाज पटेलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अरबाज म्हणाला की, "निक्कीची आई घरात तिला सांगत आहे की, माझा साखरपुडा झाला आहे. मला एवढंच सांगायचंय की, माझा साखरपुडा आणि लग्न यातलं काहीच झालं नाहीय. या सगळ्या फक्त अफवा आहेत, मी खरं बोलतोय. निक्कीचं चिडणं स्वाभाविक आहे, कारण तिला बाहेर काय घडतंय, हे माहित नाही. नंतर आम्ही भेटल्यावर मी तिला सगळं सांगेन". राजश्री मराठीशी बोलताना अरबाजने ही प्रतिक्रिया दिली आहे.

निक्कीच्या आईचा अरबाजबद्दल धक्कादायक खुलासा

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

बाईईई... यूट्यूबर अदनान शेखच्या लग्नात अरबाज पटेलची हजेरी, या तरुणीसोबत फोटो काढताना दिसला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 10 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaTop 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 Dec 2024Maharashtra Fake Crop Insurance Issue:  महाराष्ट्रात बोगस विम्याचं भरघोस पीक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget