एक्स्प्लोर

Shreyas Talpade : 'आधी ते देशाचा विचार करतात, देशाचा कौलही त्यांनाच'; श्रेयस तळपदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 

 Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे याने त्याचं राजकारणाविषयी मत व्यक्त केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे

Shreyas Talpade : अवघ्या काही दिवसांमध्ये देशाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा पंतप्रधान होणार की देशात सत्तापालट होणार, हे येत्या 4 जून रोजी स्पष्ट होईल. पण त्याआधी पक्षांकडून सुरु असलेला प्रचार आणि जनसंवाद या सगळ्यात प्रत्येक राजकीय पक्ष कसोशीचे प्रयत्न करतोय. त्यातच कलाकार मंडळी देखील त्यांचा सहभाग दर्शवत आहेत. तसेच काही मंडळी हे त्यांचं मतही व्यक्त करत आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) देखील सध्याच्या राजकीय स्थितीवर त्याचं मत व्यक्त केलं आहे. 

श्रेयस हा नुकतच 'ही अनोखी गाठ' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता श्रेयस 'कर्तम् भुगतम्' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सगळ्यात सध्याच्या राजकीय स्थितीवर श्रेयसने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. श्रेयसने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. तसेच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील कौतुक केलंय. 

नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील - श्रेयस तळपदे

'सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फार कौतुक वाटतं. कारण गेली 10 वर्ष पंतप्रधान मोदी आपल्या देशाचं काम करत आहेत. त्यामुळे ते आधी देशाचा विचार करतात. म्हणूनच जनतेचा कौलही त्यांनाच आहे. एकूणच सध्याची स्थिती पाहता नरेंद्र मोदीच पुन्हा निवडून येतील अशी चिन्हं आहे', असं श्रेयने म्हटलं आहे. 

श्रेयसच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचप्रमाणे श्रेयसच्या म्हणण्यानुसार, जनतेचा कौलही नरेंद्र मोदींना मिळणार का हे येत्या 4 जून रोजी स्पष्ट होईलच. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीवर श्रेयसने केलेल्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

'कर्तम् भुगतम्' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

श्रेयस हा कर्तम् भुगतम् या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये तो श्रेयससोबत अभिनेता विजय राज हा देखील झळकणार आहे. त्यामुळे विजय आणि श्रेयसची जोडी प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरेल हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल. श्रेयसचा हा सिनेमा येत्या 17 मे रोजी सिनेमागृहांमध्ये येणार आहे.    Shreyas Talpade, Entertainment News, Entertainment, Lok Sabha 2024, Lok Sabha Election, PM Modi, Maharashtra, India                          

ही बातमी वाचा : 

Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget