एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Rashmika VS Vijay : रश्मिका की विजय; कोणाची संपत्ती जास्त?
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेही टॉलिवूडमधील सुपरहिट स्टार्स आहेत. कोणाची नेटवर्थ जास्त आहे आणि कोण कमावतो अधिक; जाणून घ्या त्यांची लक्झरी लाइफस्टाइल आणि कमाईचे रहस्य!
Rashmika VS Vijay (Photo Credit : Pinterest)
1/10

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्याबद्दल खूप अफवा पसरत आहे. तर चला जाणून घेऊयात या दोघांची नेटवर्थ.
2/10

टॉलीवूड ऍक्टर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या खूप चर्चेत दिसत आहेत. एका जवळच्या कार्यक्रमात साखरपुडा केल्याचे अफवा पसरत आहे. साखरपुड्यामध्ये त्यांचे मित्र आणि कुटुंब देखील उपस्थित होते.
3/10

विजय देवरकोंडा यांना लक्झरी कार कलेक्शनचीही आवड आहे, त्यांच्या कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू 5 सिरीजचा समावेश आहे ज्याची किंमत 61-48 लाख रुपये आहे. याशिवाय, त्याच्याकडे 75 लाख रुपयांची फोर्ड मस्टँग,85 लाख रुपयांची व्होल्वो एक्ससी90 आणि 64 लाख रुपयांची रेंज रोव्हर आहे.
4/10

अनेक रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती 50-70 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. लायगर अभिनेत्याच्या उत्पन्नाच्या त्याच्या चित्रपटांमधून त्याचे फॅशन लेबल राउडी क्लब आणि व्हॉलीबॉल संघाची मालकी यांचा समावेश आहे. तो अनेक एंडोर्समेंट डीलमधूनही भरपूर कमाई करतो.
5/10

रिपोर्टनुसार, हैदराबादमधील फिल्म सिटी विजय देवरकोंडा यांच्या बहुमजली बंगल्याची किंमत 15 कोटी रुपये आहे.
6/10

15 ऑक्टोबर 2018 रोजी, "वर्ल्ड फेमस लव्हर" या अभिनेत्याने त्याचा फॅशन ब्रँड लाँच केला आणि 2020 ध्ये मिंत्रावर राउडी वेअर लाँच केले. गेल्या काही वर्षांत या फॅशन ब्रँडने आघाडीच्या ऍथलेटिक आउटफिटसर्पैकी एक म्हणून स्वतःची स्थापना केली आहे.
7/10

रश्मिका मंदाना हिला भारताची नॅशनल क्रश म्हणूनही ओळखले जाते. रिपोर्टनुसार, 'छावा' या अभिनेत्रीची एकूण संपत्ती 66 कोटी रुपये आहे. तिने तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 4-8 कोटी रुपये मानधन घेतली आहे.
8/10

रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' मध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारण्यासाठी तिला १० कोटी रुपये मिळाले. रश्मिकाच्या उत्पन्नाच्या इतर ब्रँड एंडोर्समेंटचा समावेश आहे. ती बोट, कल्याण ज्वेलर्स, 7अप आणि मीशो सारख्या ब्रँडशी संबंधित आहे.
9/10

रश्मिकाने व्हेगन ब्युटी कंपनी प्लममध्येही गुंतवणूक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदाना हिची रिअल इस्टेटमध्ये चांगली पकड आहे, ज्यामध्ये मुंबई, हैदराबाद, गोवा आणि कूर्गमधील घरांचा समावेश आहे.
10/10

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Oct 2025 01:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड



















