एक्स्प्लोर
कपूर फॅमिलीत लवकरच सनईचौघडे वाजणार! अर्जुन कपूरच्या बहिणीच्या साखरपुड्याचे खास फोटो
कपूर फॅमिलीत सध्या आनंदाचं वातावरण आहे! अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर अखेर लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे.
entertainment
1/6

बॉलिवूडचे प्रसिद्ध कपूर फॅमिलीत लवकरच सनईचौघडे वाजणार आहे. अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने 2 ऑक्टोबरला तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत साखरपुडा केला होता. आता अंशुलाने तिच्या साखरपुड्याचे काही इनसाइड फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/6

अंशुला कपूर-रोहन ठक्कर यांचा साखरपुडा गुजराती कस्टम 'गोर धना' सोबत झाला. हा खास दिवस बोनी कपूर यांच्या वांद्रे येथील आलिशान बंगल्यात साजरा करण्यात आला, जिथे संपूर्ण कपूर कुटुंब जमले होते.
3/6

साखरपुड्याच्या दोन दिवसांनंतर, अंशुलाने इंस्टाग्रामवर अधिकृत फोटो शेअर केले. यात काही भावनिक आणि आनंददायक क्षणांमुळे चाहत्यांना या सुंदर क्षणाची झलक पाहायला मिळालीय .
4/6

या फोटोमध्ये सोनम कपूर, रिया कपूर, शनाया कपूर, शिखर पहाडिया आणि करण बुलानी देखील दिसत आहेत
5/6

अंशुलाने हे फोटो शेअर करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, हसणं, मिठ्या, आशीर्वाद आणि आपल्याला पूर्णत्व देणारे सगळे आपल्या भोवती होते. आणि मग आईचं प्रेम... शांतपणे आमच्याभोवती पसरलेलं. तिच्या फुलांत, तिच्या शब्दांत, तिच्या जागेवर. तिची उपस्थिती अजूनही जाणवत होती प्रत्येक ठिकाणी.
6/6

आणि आज खरंच जाणवलं. त्यांच्या प्रेमाने मला खात्री पटते की परीकथा केवळ पुस्तकांमध्येच नसतात, तर वास्तविक जीवनातही असतात.
Published at : 05 Oct 2025 04:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















