Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
Salman Khan Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी सीझन 3'ची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सलमा खान 'बिग बॉस'चा तिसरा सीझन होस्ट करणार नाही.
Salman Khan Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. छोट्या पडद्याप्रमाणे ओटीटीवरही (OTT) 'बिग बॉस'ची हवा आहे. ओटीटीवर अनेक शो येत असतात. पण 'बिग बॉस'ची एक वेगळीच लोकप्रियता आहे. चाहत्यांना हा कार्यक्रम पाहायला आवडतो. या लोकप्रियतेचं कारण सलमान खान (Salman Khan) आहे. सलमान खानने 'बिग बॉस ओटीटी'चा मागचा सीझन होस्ट केला आहे. पण या सीझनमध्ये मात्र सलमान खान दिसणार नाही. तिसऱ्या सीझनसाठी अन्य तीन लोकांना अप्रोच करण्यात आलं आहे.
'बिग बॉस ओटीटी 3'ची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. तिसरा सीझन येणार नसल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पण नंतर ती अफवा निघाली. 'बिग बॉस ओटीटी 3'चा जूनचा पहिल्या आठवड्यात प्रीमिअर होणार आहे. 'बिग बॉस ओटीटी 3'साठी सलमान खानकडे तारखा नाहीत. त्यामुळे आता निर्माते सलमान खानऐवजी कोणाला घ्यायचं याचा विचार करत आहेत.
'बिग बॉस ओटीटी 3' कोण होस्ट करणार? (Bigg Boss OTT 3 Host)
'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सीझन सलमान खान होस्ट करणार आहे. सलमानऐवजी अनिल कपूर (Anil Kapoor), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यापैकी कोणीतरी हा कार्यक्रम होस्ट करेल. या कार्यक्रमासाठी संजय दत्तसोबतही चर्चा सुरू आहे. करण जोहर हा कार्यक्रम होस्ट करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'बिग बॉस ओटीटी'चं पहिलं पर्व सलमान खानने होस्ट केलं होतं.
'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'हे' सेलिब्रिटी दिसू शकतात... (Bigg Boss OTT 3 Contestants)
'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या दोन सीझनच्या यशानंतर निर्मात्यांनी तिसरा सीझनदेखील यशस्वी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनची दिव्या अग्रवाल विजेती झाली होती. तर दुसऱ्या पर्वाचा एल्विश यादव विजेता झाला होता. तर दुसरा रनरअप अभिषेक मल्हान होता. दिल्लीची वडा पाव गर्ल तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. वडा पाव गर्लसह अर्यांशी शर्मा, शहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, रोहित खत्री, दलजीत कौर, अरहान बहल, शीझान खान, मॅक्सटर्न, ठगेश, श्रीराम चंद्रा आदि स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या विजेत्याला 'बिग बॉस'च्या टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची ऑफर देण्यात येते.
संबंधित बातम्या