Shraddha Kapoor : महागडी कार सोडून ही अभिनेत्री करतीये रिक्षाने प्रवास; ओळखलंत?
Social Media : या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
Shraddha Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या अभिनानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. आशिकी 2 मध्येआरोही नावाची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा आहे. श्रद्धा वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच श्रद्धानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती रिक्षामधून प्रवास करताना दिसत आहे. श्रद्धाने शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
श्रद्धाने रिक्षामधून प्रवास करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'रिक्षा राइड आणि जूनी गाणी हा माझा पर्फेक्ट संडे ' श्रद्धानं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेकांनी लाइक केलं आहे. तर श्रद्धाच्या काही चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं श्रद्धाच्या या व्हिडीओवर कमेंट केली, 'हा व्हिडीओ पाहून आमचा रविवार चांगला जाणार आहे.' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'असं वाटतं की मी रिक्षा ड्रायव्हर व्हावं'
View this post on Instagram
लवकरच श्रद्धा दिग्दर्शक- निर्माता लव्ह रंजन यांच्या एका आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात श्रद्धासोबत रणबीर कपूर देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Nia Sharma : 'पैशांसाठी कराव्या लागतात विणवण्या'; नियानं सांगितला स्ट्रगलचा अनुभव
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर का दिसते स्लिम ट्रिम? जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha